Rescue workers and local authorities at the site where a four-storey building collapsed in Dombivli West, leaving 25 families homeless. esakal
मुंबई

Dombivli west Building incident : मोठी बातमी! डोंबिवली पश्चिमेतील 25 कुटुंब राहत असलेली चार मजली इमारत खचली!

Dombivli building News : साधारण ४५ वर्षे जुनी होती इमारत; एक ज्येष्ठ दाम्पत्य अडकले होते, मात्र त्यांची अग्निशमन दलाने त्यांची सुखरूप सुटका केली.

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

dombivli west news : डोंबिवली पश्चिमेतील गुप्ते रोडवरील सिमंतिनी इमारत खचल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. 45 वर्षे जुन्या या इमारतीत साधारणतः 25 कुटुंब राहत होती. इमारत खचत असल्याची माहिती मिळताच कुटुंबांनी आपले महत्त्वाचे सामान घेऊन बाहेर पळ काढला. रात्री साडेनऊच्या दरम्यान अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली दरम्यान यावेळी इमारतीमध्ये एक ज्येष्ठ दांपत्य अडकले होते. अग्निशमन दलाने त्यांना सुखरूप बाहेर काढले.

डोंबिवली पश्चिम येथील गुप्ते रोडवरील शिव मंदिर जवळ ही सोसायटी आहे. ती सोसायटी 45 वर्षे जुनी असून धोकादायक अवस्थेत आहे. दुपारी 4 वाजेनंतर इमारतीचा तळमजल्याचा भाग खचत होता. रहिवाशांना याचा संशय आल्याने त्यांनी तेथे जाऊन पाहणी केली असता इमारतीला खालच्या बाजूस तडे गेल्याचे आढळून आले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे काय करावे असा त्यांना प्रश्न पडला आणि त्यांचा गोंधळ उडाला. अखेर साडेनऊच्या दरम्यान विष्णुनगर पोलीस कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आपत्कालीन विभाग तसेच डोंबिवली पश्चिम अग्निशमन दलास याची माहिती रहिवाशांनी दिली. अग्निशमन दलाने त्वरित घटनास्थळी धाव घेत सर्व रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. एक ज्येष्ठ दांपत्य तिसऱ्या मजल्यावर अडकले होते, अग्निशमन दलाने त्यांनाही सुखरूप बाहेर काढले.

सुरुवातीला त्या इमारतीत राहणाऱ्या 25 रूम मालकांनी आणि तीन गाळाधारकांनी आपण ऐन पावसाळ्यात जाणार कुठे आम्ही घर खाली करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र विष्णू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार आणि महापालिका अधिकाऱ्यांनी सर्व रहिवाशांची समजूत काढून त्यांना घर खाली करण्यास सांगितले. तेव्हा रात्री सर्व रहिवाशी घर खाली करण्यास तयार झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Winner: स्मृती मानधानाच्या RCB ने इतिहास रचला, दुसऱ्यांदा जिंकले जेतेपद; दिल्ली सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Aishwarya Special Wishes to Abhishek: ऐश्वर्याने अभिषेकला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा; लहानपणीचा फोटो शेअर केला अन् म्हणाली...

WhatsApp Scam : व्हॉट्सॲप ‘गुंतवणूक’ सापळा, तिघांना सव्वा कोटींचा गंडा; व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक पडली महागात

झेडपीसाठी उद्या मतदान! सोलापूर जिल्ह्यात 8 वर्षांत वाढले 3.27 लाख मतदार; लाडक्या बहिणींचा टक्का वाढला; 2017 मध्ये झाले होते 66.96 टक्के मतदान, वाचा...

Meghalaya Coal Mine Blast : मेघालय हादरलं! अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, मृतांचा आकडा १८ वर; अनेक अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT