मुंबई

Dombivali: जागतिक पुस्तक दिनानिमित्त डोंबिवलीत साकारले बुक स्ट्रीट

शर्मिला वाळुंज

Dombiwali: जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने 'पै फ्रेंड्स लायब्ररी'च्या वतीने डोंबिवलीत बुक स्ट्रीट या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात सुमारे 1 लाख पुस्तके मांडण्यात आली होती. हजारो वाचकांनी या उपक्रमास भेट देत मोफत पुस्तकांचा खजिना लुटला. (book street in dombiwali)

गतवर्षीपासून सुरू झालेल्या भारतातील या पहिल्यावहिल्या उपक्रमामध्ये वाचन प्रेमींसाठी विनामूल्य पुस्तके देण्यात आली. जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने 'पै फ्रेंड्स लायब्ररी'च्या वतीने सांस्कृतिक नगरी असलेल्या डोंबिवली हा उपक्रम राबविण्यात आला. फडके रोडवर रविवारी सकाळी 5 वाजल्यापासून याची सुरवात झाली. (maharashtra news )

(Marathi News) ५ तासात या उपक्रमास 8 हजारच्या आसपास नागरिकांनी उपस्थिती लावत पुस्तकांचा खजिना लुटला. वाचन संस्कृती वृध्दींगत व्हावी या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये रसिकांना कूपनद्वारे प्रवेश दिला जात होता.

त्यावर तिथे उपलब्ध असलेले कोणतेही एक पुस्तक पूर्णपणे मोफत निवडता येत होते. गेल्यावर्षी साडे चार हजार वाचकांनी या उपक्रमाला भेट दिली होती. पुस्तकांपासून तयार केलेली 'आय लव्ह बुक्स' ही प्रतिकृती यंदाच्या बुक स्ट्रीटचे खास होते. बुक स्ट्रीट उपक्रम यशस्वी होण्यास कल्याण डोंबिवली महानगरपलिका, डोंबिवली शहर वाहतूक विभाग आणि डोंबिवली शहर पोलिस विभाग यांचे विशेष सहकार्य लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT