kishori pednekar  file photo
मुंबई

भाजपाच्या नादाला लागू नका, महापौरांचं मुंबईकरांना आवाहन

लोकांनी त्यांना घरी बसवलय. पुढेही घरी बसवणार आहेत.

दीनानाथ परब

मुंबई: "महापालिका मुंबईतील परिस्थिती आपल्यापरीने कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतेय. बाजारपेठा अशाच भरत राहिल्या, तर लोकांनी विचार केला पाहिजे. लॉकडाउन नको असं लोक सांगतात. पण लोक गर्दी करणार, रुग्ण वाढवणार मग पर्याय काय तो तुम्हीच सांगा?" असा सवाल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलाय. "लॉकडाउनचे नियम पाळण्याचं आवाहन केलं जातय. पण पाच ते १० टक्के लोक ऐकत नाही. सर्व पर्यायांचा विचार करुन झालाय. आजही अशीच मार्केट फुल होणार असतील, तर मुंबईसाठी स्थिती विदारक होऊ शकते" असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

"मुंबईतील वाढती कोरोना रुग्ण संख्या विचारात घेऊन, खासगी रुग्णालयांकडून किती संख्येने बेड्स घेतलेत. त्यात ऑक्सिजन आणि आयसीयू बेडस किती आहेत, त्याची माहिती महापौरांनी दिली. दर तासाला कोरोना रुग्ण संख्या वाढणं योग्य नाही. मुंबईत विदारक चित्र आहे. ज्याच्या घरात घडतय त्याला कळतय. मुंबईकरांनी काळजी घ्यावी" असे आवाहन महापौरांनी केले.

मुंबईकरांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याबद्दल महत्त्वाची बातमी

स्टेप डाऊन संकल्पेनेचे महत्त्व त्यांनी विषद केले. खासगी हॉस्पिटलचे बेड रिकव्हरीसाठी अडवून ठेवले जातात. कोरोनामधुन बरे झाल्यानंतर रिकव्हरीची गरज असते. हे रिकव्हरीचे रुग्ण हॉटेलमध्ये दाखल झाले, तर गरजू रुग्णांना आयसीयू, ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होतील. लोकांचे प्राण वाचवता येतील असे महापौरांनी सांगितले.

रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या खरेदीत भ्रष्टाचारा होतोय, या भाजपाच्या आरोपावर त्या म्हणाल्या कि, "ज्यांना कोणाला आरोप करायचे आहेत, त्यांना करुन दे, त्यांच्याकडे दुसरे उद्योग नाहीत. आमचं पहिलं प्राधान्य मुंबईकरांच्या जीवाला आहे. पैशांपेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा आहे."

"विरोधक मुंबईकरांच्या मनात संभ्रम निर्माण करतायत. त्यामुळेच बाजारात गर्दी दिसतेय. चिथावणी देणाऱ्या लोकांकडे लक्ष देऊ नका. जे नियम सांगितलेत, त्याचे पालन करा, त्याचं उल्लंघन करु नका. मुंबई महापालिकेने ज्या दराने रेमडेसिव्हीर इंजेक्शन खरेदी केले, इतर राज्यांनीही त्याच दराने इंजेक्शन विकत घेतले आहे. भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये जरा चौकशी करा, भाजपा कशाला गोंधळ घालतोय. भाजपा गोंधळी म्हणून काम करत आहेत. लोकांनी त्यांना घरी बसवलय. पुढेही घरी बसवणार आहेत. त्यांच्या नादाला लागू नका" असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT