मुंबई

चुकवू नका...जन्मनोंदणीची अखेरची संधी!

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : शाळा-महाविद्यालयात प्रवेश असो की नोकरी; तसेच आयुष्यातील अनेक बाबींसाठी अथवा परदेशगमनासाठी जन्मदाखला आवश्‍यक ठरतो. पूर्वीच्या तुलनेत सद्यस्थितीत आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या जन्मदाखल्यांसाठी सर्वच आग्रही असतात.

1969 पूर्वी अथवा नंतर नावाशिवाय केवळ जन्माची नोंद झालेल्या नागरिकांना आपल्या जन्माची नोंद करून दाखला मिळवण्याची अखेरची संधी उपलब्ध झाली आहे. याबाबतचा अध्यादेश यापूर्वीच जारी करण्यात आला असून 14 मे 2020 नंतर वंचित राहिलेल्यांना जन्मनोंदणी करता येणार नाही, असे निर्देश राज्याच्या आरोग्य सेवा उपसंचालकांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जन्म-मृत्यू नोंद विभाग निबंधक व उपनिबंधकांना दिले आहेत. 

सरकारच्या आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक तथा राज्याचे जन्म-मृत्यू उपमुख्य निबंधकांनी एका अधिसूचनेद्वारे ज्या नागरिकांची जन्माची नोंदणी 1 जानेवारी 2000 पूर्वी झालेली आहे, ज्यांच्या नोंदणीला 15 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे, अशा सर्व नागरिकांना जन्मनोंदणीची संधी मिळणार आहे. किंबहुना 1969 पूर्वी नोंदणी केलेल्या व्यक्ती अथवा त्यांच्या पालकांनादेखील जन्मनोंद करता येणार असून ही मुदत केवळ 14 मे 2020 पर्यंतच उपलब्ध असेल. त्यानंतर हा कालावधी कुठल्याही परिस्थितीत वाढवून मिळणार नाही, अशी सूचना देण्यात आली आहे. 

त्यासाठी नागरिकांना नावाच्या खात्रीसाठी शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, आधारकार्ड यापैकी एका पुराव्यासह जन्म व मृत्यू नोंदणी कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. नवजात बालकांसाठी रुग्णालयाकडून 21 दिवसांच्या आत जन्म-मृत्यू विभागाकडे नोंद झाल्यास जन्मदाखल्याची प्रथम प्रत मोफत आणि पुढील प्रत्येक प्रतीसाठी 20 रुपये नाममात्र शुल्क आकारण्यात येते.

त्याच धर्तीवर आता अर्ज करणाऱ्या नागरिकांनाही 20 रुपये शुल्क आणि अवघे 5 रुपये विलंब शुल्क आकारून जन्मनोंदीचे प्रमाणपत्र मिळणार असल्याची माहिती ठाणे महापालिका जन्म व मृत्यू विभागाकडून देण्यात आली. 

ठाणे महापालिकेद्वारे जन्मनोंदीपासून वंचित नागरिकांना नेहमीच विनामूल्य सहकार्य केले जाते. तरीही, जन्मनोंदीची नोंद पालिकेच्या रजिस्टरमध्ये नसल्यास जन्म व मृत्यू विभागाकडून अनुलब्धता प्रमाणपत्र घेऊन जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 चे कलम व महाराष्ट्र जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम 2000 नियम 10 नुसार न्यायालयीन प्रक्रियेद्वारे दाखले मिळवता येतील. 
- विनय पाटील, उपनिबंधक, 
ठाणे पालिका जन्म-मृत्यू विभाग 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : ड्रग्स तस्करी प्रकरणातील वाँटेड आरोपी विरेंदर बसोयाला पुण्यात आणणार

SCROLL FOR NEXT