मुंबई

'सावित्रीजोती' मालिका बंद करू नका, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन

मिलिंद तांबे

मुंबई: सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'सावित्रीजोती' ही सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील मालिका बंद करू नये अशी विनंती राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे. तसेच या मालिकेच्या निर्मितीसाठी चित्रपटाप्रमाणे अनुदान देण्याबाबत विचार करावा, अशी विनंती ही त्यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांना या विषयावर लिहिलेल्या पत्राद्वारे केली आहे.

टीआरपी न मिळाल्याने ही मालिका बंद करण्याचा निर्णय या वाहिनीने  घेतला असल्याचे वृत्त अंत्यत वेदनादायी आहे.महाराष्ट्र म्हणजे फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र अशी ओळख आहे आणि तरीही महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित टिव्ही मालिका अपेक्षित दर्शक संख्या मिळत नसल्याने निर्मात्यांना बंद करावी लागतेय, हे  वृत्त सर्वच पुरोगामी संवेदनशील लोकांसाठी आणि महाराष्ट्रासाठी चिंताजनक आहे. ही मालिका बंद झाल्यास महापुरुषांचा इतिहास आजच्या पिढीपर्यंत कसा पोहचणार? त्यामुळे जनतेनी ही मालिका आवर्जून पहावी, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच ही मालिका चालू ठेवण्याची  विनंतीही त्यांनी सोनी मराठी आणि मालिकेच्या निर्मात्याला विनंती केली आहे. चित्रपटाच्या धर्तीवर या मालिकेला अनुदान देण्याबाबत  विचार करावा," अशी विनंती त्यांनी सांस्कृतिक मंत्री देशमुख यांना पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.

मंत्री नितीन राऊत यांनी आमच्याकडे विनंती केली आहे. आम्ही त्या दृष्टीने विचार करतोय. या प्रस्तावाची व्यवहार्यता तपासून त्यावर योग्य निर्णय घेतला जाईल.
अमित देशमुख , सांस्कृतिक कार्यमंत्री

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Don't stop Savitrijoti Daily soap Serial Nitin Raut Appeal amit deshmukh

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प बॉक्सर अन् टी-शर्टवर आले, निरोध देखील वापरला नाही; पॉर्न स्टारने केले अनेक खुलासे

Air India Express: एअर इंडिया एक्स्प्रेसची 70 उड्डाणे रद्द; 300 कर्मचारी सुट्टीवर, काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : एअर इंडियाची ७० हून अधिक उड्डाणे रद्द

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे मोठे भाकित, राष्ट्रवादी बद्दल देखील दिले संकेत 

Met Gala 2024 : अरबपती सुधा रेड्डीच्या ड्रेसपेक्षा नेकलेसचीच जास्त हवा, 180 कॅरेटच्या डायमंड नेकलेसने सर्वांचंच वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT