retail store 
मुंबई

ब्रॉण्डेड वगैरे काही नको, असेल ते द्या..., कोरोनामुळे ब्रॉण्डेडचे फॅड मोडीत

सकाळवृत्तसेवा

डोंबिवली : अमुक ब्रॅण्डचे दूध चांगले, आम्ही तमुक ब्रॅण्डचेच बिस्कीट खातो. मसालेही विशिष्ट ब्रॅण्डचेच वापरतो, असे म्हणत ब्रॅण्डेड वस्तू खरेदीकडे अनेकांचा ओढा असतो,  मात्र सध्या कोरोनामुले संचारबंदी सुरू असल्याने जीवनावश्यक वस्तूंचा तुटडवा जाणवत आहे. त्यामुळे ब्रॅंडेड वस्तू सोडाच साध्या दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे "ब्रॅण्डगिरीला" तिलांजली वाहून मिळेल ती वस्तू आपल्या पदरात पाडून घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. 

ब्रेड, दूध, बिस्कीट, मसाले, हळद, नमकीन पदार्थ, तूप, पनीर, बासमती तांदूळ आदी दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू खरेदी करताना ग्राहक आपल्या आवडत्या ब्रॅण्डच्या  काहीशा महागड्या वस्तू  खरेदी करण्यास पसंती देत होते. कोरोना विषाणूमुळे माल वाहतूक करणाऱ्या गाड्या व कामगार यांची टंचाई असल्याने त्याचा परिणाम किरकोळ दुकानातील वस्तूंवर झाला आहे. हवे त्या कंपनीचे प्राॅडक्ट मिळणे कठीण झाले आहे. उलटपक्षी  कोणत्याही कंपनीची उपलब्ध असलेली वस्तू झटपट खरेदी करून ग्राहक मोकळे होत आहे. याचा फायदा काही लोकल उत्पादकांनी घेतला असून किरकोळ बाजारात आपली एन्ट्री केली आहे. त्यात हळद, मसाले, चमचमीत पदार्थ, चिक्की, टोस्ट यांचा समावेश आहे. त्यामुळे एरवी तोलून, पारखून निवांत सुरू असलेल्या खरेदीला ब्रेक लागला असून आहे. मिळेल त्या वस्तू खरेदी केल्या जात आहेत. 

पहिले ग्राहक विशिष्ट कंपनीच्या वस्तूंसाठी दुकानात बराच वेळ घालवत होते. आता वस्तू प्रमाणात असल्याने तोंडातून ब्र ही न काढता हळद , मसालेही लोकल ब्रॅण्डचे खरेदी केले जात आहे. 
- माणिकलाल शहा, दुकानदार 

आता मसाले कोणतेही असले, तरी स्वयंपाक रुचकरच करण्याची सवय अनेक गृहिणींच्या अंगवळणी पडली आहे. पनीरही मिळेल त्या कंपनीचे आणून आता वेगवेगळ्या पनीरच्या रेसिपी मी बनवते. 
- निलाक्षी सावंत, गृहिणी

Don't want anything branded, give it whatever it takes, the corona breaks the fad of branded

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT