मुंबई

कोव्हिशील्ड लसीचा यशस्वीरित्या 3 स्वयंसेवकांना दिला डोस

भाग्यश्री भुवड

मुंबई: ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोविड -19 बहुप्रतिक्षित लसीच्या चाचणीची शनिवारी दुपारी किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालयात सुरूवात झाली. चाचण्यांच्या पहिल्याच दिवशी 20 ते 45 वयोगटातील तीन स्वयंसेवकांना दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांचा भाग म्हणून इंट्रामस्क्युलर डोस दिला गेला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन निरोगी स्वयंसेवकांपैकी दोन उद्योजक आहेत, तर त्यातील एक सरकारी संस्थेतील संशोधक आहे. दरम्यान, रुग्णालयाच्या प्रशासनाने गोपनीयतेचे कारण सांगून स्वयंसेवकांची ओळख जाहीर करण्यास नकार दिला आहे. 

केईएम रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख म्हणाले की तिन्ही स्वयंसेवक सुदृढ आहेत आणि त्यांच्यात कोणत्याही कोमॉरबिडीज किंवा कोणताही वैद्यकीय इतिहास नाही. ते कोरोना व्हायरसच्या संपर्कात आले आहेत का हे तपासण्यासाठी आरटी-पीसीआर आणि अँटीबॉडी चाचण्या केल्या गेल्या आहेत. 

ते म्हणाले, “आम्ही शनिवारी दुपारी तीन स्वयंसेवकांना पहिला डोस दिला, त्यानंतर त्या सर्वांना लसीकरणानंतर एक तासासाठी निरीक्षणाखाली ठेवले आणि नंतर घरी जाण्याची परवानगी दिली. दुसर्‍या टप्प्यात आम्ही त्याच्या सुरक्षेचे निरीक्षण करण्याचा प्रयत्न करू. इंजेक्शननंतर ताप, मळमळ, चक्कर येणे किंवा लालसरपणा आणि सूज यासारखे दुष्परिणाम दिसले तर त्याचे ही आकलन केले जाईल असे डॉ. देशमुख म्हणाले.

रुग्णालयाने प्रक्रियेसाठी आणखी 20 स्वयंसेवकांची निवड केली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) नुसार प्रत्येक स्वयंसेवक चाचणीच्या काळात होणाऱ्या दुष्परिणामांमुळे मरण पावला तर त्यांना एक कोटी जीवन विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे. तसेच, लसीकरणामुळे काही विपरीत परिणाम झाल्यास त्यांच्याकडे वैद्यकीय विमा 50 लाख रुपये देण्यात आला आहे.

दरम्यान, सोमवारी तीन महिला स्वयंसेवकांना बीवायएल नायर रुग्णालयात कोविड 19 लसीचा पहिला डोस देण्याची शक्यता आहे.

-------------------

(संपादनः पूजा विचारे) 

Dosage of Covishield vaccine successfully given to 3 volunteers

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: पानिपत'कारांच्या गळ्यात मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाची माळ?

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

TET Exam Date : टीईटी परीक्षेची तारीख ठरली, परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क 'या' तारखेपासून भरता येणार

SCROLL FOR NEXT