Mumbai Local Latest Update 
मुंबई

Mumbai Local Update : डोंबिवली स्थानकात तांत्रिक बिघाड! डाऊन जलद मार्गावरील लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने

Mumbai Local Latest Update : डोंबिवली स्थानकात ओव्हर हेड वायर मध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे कल्याण दिशेकडील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

शर्मिला वाळुंज

Mumbai Local Latest Update : डोंबिवली रेल्वे स्थानकात सोमवारी दुपारी ओव्हरहेड वायर मध्ये झालेल्या बिघाडामुळे लोकलचे वेळापत्रक बिघडले. यामुळे कल्याण दिशेकडील जलद मार्गावरील लोकल सुमारे अर्धा तास उशिराने धावत होत्या. फलाट क्रमांक 4 वरील फलाटाचा पत्रा ओव्हरहेड वायरला टच झाल्याने स्पार्क झाले व वायरचा सप्लाय बंद करण्यात आला व त्यामुळे लोकल खोळंबल्याची बाब रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास येताच पत्रा हटविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

डोंबिवली रेल्वे स्थानकात सोमवारी दुपारी 3.55 च्या दरम्यान हा बिघाड झाल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. फलाट क्रमांक 4 वर डोंबिवली ते ठाकुर्ली दरम्यान सेवाग्राम एक्सप्रेस खोळंबली होती. ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने 3.58 ची बदलापूरला जाणारी लोकल फलाटावरच उभी होती. त्याविषयी रेल्वे प्रशासनाकडून फलाटावर उद्घोषणा देखील करण्यात येत होती.

फलाट 4 वर कल्याण दिशेकडील फलाटाचा पत्रा सरकून तो ओव्हरहेड वायरला टच झाला. यावेळी स्पार्क झाल्याने त्या वायरचा पॉवर सप्लाय बंद करण्यात आला. यामुळे लोकल जागेवरच खोळंबल्या. रेल्वे प्रशासनाने त्वरित हा पत्रा काढून ओव्हरहेड वायरचा सप्लाय पूर्ववत केल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर लोकल सुरू झाल्या. मात्र यामुळे सुमारे अर्धा तास लोकल उशिराने धावत होत्या. तर मुंबईकडे जाणाऱ्या लोकल देखील 15 मिनिटे उशिराने धावत होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT