मुंबई

''या'' ठीकाणी होणार डाॅ. बाबासाहेब व आण्णाभाऊंचे स्मारक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बीआयटी चाळ-परळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असणाऱ्या घरी आणि घाटकोपरमधील चिराग नगर येथे अण्णाभाऊ साठे यांचे वास्तव्य असणाऱ्या घरी गृहनिर्माण विभागामार्फत राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. यावेळी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर आदी अधिकारी उपस्थित होते.

वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात शनिवारी (ता.१८) आढावा गृहनिर्माण मंत्र्यांनी बैठक घेतली. यावेळी म्हाडामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती आव्हाड यांनी घेतली. यावेळी आव्हाड म्हणाले की, या दोन्ही स्मारकांसंदर्भात लवकरच पुढील कार्यवाहीला प्रारंभ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अण्णाभाऊ साठे यांचे वास्तव्य असणाऱ्या घराच्या ठिकाणी सद्यस्थितीत राहत असलेल्या रहिवाशांचे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असणाऱ्या घरी राहणाऱ्या रहिवाशांचे पुनर्वसन मुंबईत प्रकल्पग्रस्त म्हणून सरकारतर्फे इतरत्र करण्यात येणार आहे. या दोन्ही स्मारकांना पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात येणार आहे.

मुंबईतील म्हाडाच्या मोठ्या भूभागावर जुन्या वसाहती आहेत. या वसाहतींच्या पुनर्विकासातून मोठ्या प्रमाणात गृहसाठा उपलब्ध होणार आहे. या जुन्या वसाहतींच्या पुनर्विकासासाठी थेट परदेशी गुंतवणूक आणण्यासंदर्भात सरकारतर्फे प्रयत्न करण्यात येणार आहेत, असेही आव्हाड म्हणाले. 

म्हाडाच्या माध्यमातून गृहनिर्मितीच्या प्रक्रियेला वेग देण्याचा प्रयत्न करणार असून परवडणाऱ्या दरातील अधिकाधिक सदनिका उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. ४५ दिवसांच्या आत फायलीचा निपटारा म्हाडामध्ये केला जात असून ही कौतुकास्पद बाब असल्याचे आव्हाड म्हणाले.


आरईई संगणकीय प्रणालीचा शुभारंभ
मुंबई मंडळाच्या निवासी कार्यकारी अभियंता (पुनर्विकास कक्ष) यांच्यासाठी विकसित आरईई संगणकीय प्रणाली व मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्यासाठी म्हाडातर्फे विकसित ई-बिलिंग या संगणकीय प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. मुंबई मंडळाच्या निवासी कार्यकारी अभियंता (पुनर्विकास कक्ष) यांच्यासाठी विकसित आरईई संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून पुनर्विकासासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांनी प्रस्ताव सादर करावयाचा आहे. या संगणकीय प्रणालीमुळे पुनर्विकासासाठी ऑफर लेटर देणे, ना हरकत प्रमाणपत्र, त्रिपक्षीय करार, आरंभ प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याची सर्व प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT