Dr_Narendra_Dabholkar sakal media
मुंबई

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण: मुख्य आरोपीची जामिनासाठी हायकोर्टात याचिका

सुनिता महामुनकर

मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्वेसर्वा डॉ. नरेंद्र दाभोलकर (dr narendra dabholkar) यांच्या हत्या खटल्यातील (murder case) प्रमुख आरोपी डॉ. विरेंद्रसिंह तावडेने (dr Virendra Singh tawde) जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai high court) याचिका (Petition) केली आहे. तावडे जून 2016 पासून अटकेत आहे.

तावडेने केलेल्या जामीन अर्जावर दोन आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्या एस एस शिंदे आणि न्या एन जे जमादार यांच्या खंडपीठाने मंगळवारी दिले. त्याच्यासह अन्य तिनजणांवर यूएपीए, हत्या इ आरोप सीबीआय ने ठेवले आहेत. पुणे न्यायालयाने तावडेचा जामीन नामंजूर केला आहे. या निर्णयाला त्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. गौरी लंकेश हत्येतील आरोपीच्या जबाबाचा माझाशी संबंध लागू शकत नाही असा दावा त्याने केला आहे.

दाभोलकर हत्येचा सूत्रधार तावडे असून अंधश्रद्धा विरोधात मोहीम चालविणाऱ्याना दहशत बसविण्यासाठी हत्या घडविली असा आरोप सीबीआयने ठेवला आहे. दाभोलकर यांची पुण्यात ता 20 औगस्ट 2013 रोजी सकाळच्या वेळी दोन बाईकस्वारांनी हत्या केली होती. उच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयला सोपविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 380 अंकांनी वाढला; आज Adani सह 'हे' शेअर्स राहणार फोकसमध्ये

Latest Marathi News Live Update : लोणार तालुक्यात मध्यरात्री भीषण आग

स्मिता पाटील यांच्या मृत्यूवेळी रुग्णालयात काय झालेलं? मैत्रिणीनं सांगितला किस्सा, म्हणाल्या, 'त्या' पत्रांमधून कळालं की...

दिंडोरी अपघात प्रकरणी चौकशी समितीने अहवाल प्रशासनाकडे सोपवला, ठेकेदार अन् अधिकाऱ्यांवर ठपका; रस्त्याचे काम अपूर्ण

Shendra MIDC fire: शेंद्रा MIDC हादरली! प्लास्टिक दाणा बनवणाऱ्या कंपनीत भीषण आग, कोट्यवधींचं नुकसान?

SCROLL FOR NEXT