मुंबई

दहावी बारावी निकालांबाबत मोठी अपडेट, स्वतः राज्य मंडळ अध्यक्षा डॉ शकुंतला काळे यांची माहिती

सकाळवृत्तसेवा

मुंबई, ता. 18 : कोरोनामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर परिणाम झाला आहे. अद्यापही उत्तरपत्रिका शाळांमध्ये तपासणीसाठी रखडल्या असल्याने यंदा या परीक्षांचे निकाल लांबणार आहेत. असे असताना सोशल मीडियावर निकालाच्या विविध तारखा पसरवल्या येत आहेत. या तारखांवर व अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये,असे आवाहन राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी केले आहे.

राज्य मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू असताना कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होऊ लागला. त्यामुळे राज्य सरकारने दहावीचा भूगोल विषयाचा पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊन पुढील काळात तो पेपर रद्द केला. लॉकडाऊनमुळे शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याने उत्तरपत्रिका तपासणीचे काम ठप्प झाले. त्यावर शिक्षण विभागाने शिक्षकांना घरी उत्तरपत्रिका तपासण्यासाठी परवानगी दिली. मात्र, उत्तरपत्रिका शाळा-महाविद्यालयांमध्ये अडकून पडल्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात व्यत्यय निर्माण झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिक्षक शाळा महाविद्यालयांमधून उत्तरपत्रिका तपासून राज्य मंडळाकडे जमा करत आहेत. परंतु, सर्वाधिक कोरोना प्रभावित भागातील शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे सर्व विभागीय मंडळांची निकाल तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय राज्य मंडळाला निकाल जाहीर करता येत नाही. एका विभागाचा निकाल तयार करण्यास उशीर झाला तरीही राज्याचा निकाल लांबतो.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांकडून फिजिकल डिस्टंन्सिगचे नियम पाळून निकाल तयार करण्याचे काम आता वेगाने केले जात आहे. परंतु, निकाल केव्हा जाहीर करता येऊ शकतो, याबाबतची आवश्यक असणारी माहिती अद्याप राज्य मंडळाकडे प्राप्त झालेली नाही. त्यामुळे निकालाची तारीख सद्यस्थितीत राज्य मंडळाला सांगता येणार नसल्याचे मंडळातील सूत्रांनी सांगितले. सोशल मीडियावर निकालाच्या तारखा फॉरवर्ड होत असल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. दहावी-बारावीच्या निकालाबाबत सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवा व तारखांवर विद्यार्थी व पालकांनी विश्वास ठेवू नये. राज्य मंडळाकडून निकालाच्या तारखांबाबतची माहिती जाहीर केली जाईल, असे काळे यांनी सांगितले.

dr shakuntala kale on SSC and HSC results of maharashtra state board

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: चक दे इंडिया! भारताचा पाकिस्तानवर रोमहर्षक विजय; हॉकीचं सुवर्णपदक आता एक विजय दूर...

Hingoli Court : चोर कोर्टात तारखेसाठी आले अन् इन्व्हर्टर, बॅटरीच पळवली; हिंगोलीत चोरट्यांचा प्रताप, काय आहे प्रकरण?

Ration Card: 'त्या' शिधापत्रिका निष्क्रिय होणार, सहा महिने धान्याची उचल नसल्यास सरकार घेणार मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : 'काळजी करु नका, न्याय मिळवून देऊ'; उद्धव ठाकरेंकडून प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांना ग्वाही

Shrigonda News: विवाहितेसह २२ वर्षीय तरुणाने एकत्रच संपवलं आयुष्य; नगरमधील घटनेनं खळबळ; पोलीस तपास सुरू

SCROLL FOR NEXT