Varsha Gaikawad 
मुंबई

नालेसफाईची पोलखोल! 'या' परिस्थितीला पालिका-राज्य सरकार जबाबदार; वर्षा गायकवाड यांचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई महानगर पालिका आयुक्त यांना आम्ही यापूर्वीच सांगितलं होतं की, मुंबईत नालेसफाईच्या आणि मान्सूनपूर्व कामांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, घोटाळा आणि हलगर्जीपणा करण्यात आला आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याचाच परिणाम म्हणून पहिल्याच पावसात नालेसफाईची पोलखोल झालेली आहे.असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

पहिल्याच पावसात मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आणि वाहतुकीचा बोजवारा उडाला. त्यामुळे महानगर पालिका आणि सत्ताधाऱ्यांनी मान्सूनपूर्व तयारीचे केलेले सर्व दावे पहिल्याच दिवशी फोल ठरलेले आहेत.शिंदे- फडणवीस सरकार आणि मनपा अधिकारी धांदात खोटे बोलले असल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला.

पाणी साचले, वाहतूक थांबली

पहिल्याच पावसात मुंबईत अंधेरी सबवे, एलबीएस मार्ग, साकीनाका ९० फिट रोड, माटुंगा, पश्चिम द्रुतगती मार्ग तसेच महालक्ष्मी, दादर, माहीम, धारावी, परळ, सायन, किंग सर्कल, कुर्ला, चेंबूर, अंधेरी, मुलुंड, दहिसर आदी ठिकाणच्या सखल भागांत पाणी साचले होते.

परिणामी, नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण झाली, त्यांचे प्रचंड हाल झाले. वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला होता. सर्वसामान्यांना जो नाहक त्रास सहन करावा लागत आहे याला जबाबदार कोण ? असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! उकाड्यानंतर पुन्हा पावसाची शक्यता; पुढील दोन ते तीन दिवसांचा अंदाज

Mumbai: 'लालबागचा राजा'च्या दर्शनाच्या नावाखाली ४ भाविकांना गंडा, बारावीतील विद्यार्थ्याला अटक

Patna Mother Murder : मुलानेच आईला जिवंत जाळलं; पोलिसांना म्हणाला- ‘मी देवाचा अवतार, कलियुग सुरूय, मीच तिला संपवलं'

Marathi News Live Updates : ममता बॅनर्जींची सर्वोच्च न्यायालयात धाव; TMC नाव आणि पारंपरिक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान

Badrinath Military Exhibition : बदरीनाथमध्ये मुख्यमंत्र्यांचा रायफल हातात घेत नेमबाजीचा सराव; लष्करी प्रदर्शनाची घेतली पाहणी

SCROLL FOR NEXT