जीवघेणा हल्ला Sakal
मुंबई

मद्यपी वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करताना पोलिसावर जीवघेणा हल्ला

या घटनेत पोलीस शिपाई गंभीर जखमी झाले आहेत

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाण्यातील माजीवड येथे मद्यपी वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करीत असताना एक पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारल्याची घटना घडली. या घटनेत पोलीस शिपाई गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी राबॉडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नागनाथ कांदे असे जखमी पोलीस कर्मचार्यांचे नाव आहे. तर, अनिल गुप्ता असे हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीस शिपाई नागनाथ कांदे हे वाहतूक शाखेतील कापूरबावडी पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत. धूलिवंदन निमित्ताने वाहतूक नियंमांचे उल्लंघन करणार्यांविरोधात कारवाई करण्यासाठी त्यांची नेमणूक माजीवडा येथे करण्यात आली होती. शुक्रवारी रात्री याच भागातून भागीरथ चव्हाण आणि त्याचा मित्र अनिल गुप्ता हे दोघेही दुचाकीवरून जात होते.

त्याचवेळी कांदे यांनी त्यांची दुचाकी अडवून कारवाईस सुरूवात केली. कांदे यांना कारवाई करू नका अशी दोघेही विनंती करत होते. परंतु कांदे यांनी त्यांची विनंती अमान्य केल्याने अनिलने त्यांच्या डोक्यात सिमेंटचा ब्लाॅक घातला. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आंदोलन करा, पण ठरावीक वेळेतच! सुप्रीम कोर्टानं स्पष्टच सांगितलं; काय म्हणाले CJI सूर्यकांत?

High Court: भारत धर्मनिरपेक्ष! दिया मिर्झाचा डिलीट केलेला व्हिडीओ पुन्हा शेअर करा; हायकोर्टानं भाजपला फटकारलं

Pune Bangalore Highway Traffic : राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली किणी टोलनाक्यावर चक्का जाम, पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

'आमच्या लाडक्या नाईकबाई' मालिका बंद होणार? सोशल मीडियावर रंगली चर्चा

Latest Marathi News Live Update : पुण्यातील वाहतूक कोंडी 4 वर्षांत कमी होणार, देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT