Aryan Khan Sakal
मुंबई

आर्यन खानला मिळणार जामीन?

जामिनावर आज होणार सुनावणी

स्वाती वेमूल

Aryan Khan Drugs Case: क्रूझ पार्टीप्रकरणी अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ आरोपींना न्यायालयाने गुरुवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आर्यन खानसह मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा, अरबाज मर्चंट यांना केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) याप्रकरणी पहिल्या दिवशी अटक केली होती. त्या सर्वांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान आरोपींना कारागृहात न पाठवता एक दिवस एनसीबी कोठडीतच ठेवण्याची विनंती बचावपक्षाकडून करण्यात आली. ती न्यायालयाने मान्य केली. आर्यनच्या जामिनाबाबत आज (शुक्रवारी) सुनावणी होणार आहे. यावेळी आर्यनला जामीन मिळू नये यासाठी एनसीबीकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याचं कळतंय.

एनसीबीने अचित कुमारसोबत आर्यनचे चॅट असल्यामुळे त्या दोघांना एकमेकांसोबत बसवून चौकशी करायची असल्याची मागणी केली होती. पण न्यायालयाने ती फेटाळून लावली. आर्यन आणि अरबाज यांच्या चौकशीतून अचितचं नाव समोर आलं होतं. एनसीबीने क्रूझ प्रकरणात बुधवारी अचित कुमार याला उच्च प्रतीच्या गांजासह अटक केली होती.

'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, आर्यनला तुरुंगात ठेवण्यासाठी एजन्सी आटोकाट प्रयत्न करेल. तर दुसरीकडे आर्यनकडे मर्यादित प्रमाणापेक्षा अधिक ड्रग्ज न आढळल्याचं लक्षात घेऊन न्यायालयाकडून त्याची जामिनावर मुक्तता होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अरबाज आणि मुनमुन यांनाही जामीन मिळू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT