मुंबई

'घरासमोर फटाके वाजवू नका रे'; असे म्हटल्याने मद्यपींची कुटूंबाला मारहाण

शर्मिला वाळुंज

ठाणे ः घरासमोर फटाके वाजवू नका, असे सांगितल्याचा राग आल्याने चार मद्यपी तरुणांनी एका कुटुंबातील तिघांना जबर मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली. कुटुंबातील ज्येष्ठ महिलेसही या तरुणांनी मारहाण केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

मारहाण झालेले अभिजीत वाघमारे कल्याणच्या शिवाजी वालधुनी परिसरातील रहिवासी असून भाऊबिजेच्या दिवशी ते घरी होते. यादरम्यान रात्री दहाच्या सुमारास आजूबाजूचे काही तरुण त्यांच्या घरासमोर फटाके वाजवित होते. फटाक्‍यांच्या आवाजाचा घरातील लहान मुलाला व आजींना त्रास होत होता. यामुळे अभिजीत यांनी घराबाहेर फटाके वाजविणाऱ्या तरुणांना घरासमोर फटाके वाजवू नका, अशी विनंती केली. मात्र, दारूच्या नशेत असलेल्या तरुणांनी या रागातून अभिजीत यांना घराच्या बाहेर बोलावून मारहाण केली. यावेळी उषा वाघमारे मारहाणीदरम्यान मध्यस्थी करण्यासाठी पडल्या असताना तरुणांनी त्यांच्याशीही असभ्य वर्तन करत मारहाण केली. घरातील वृद्ध आजीलाही त्या तरुणांनी मारहाण केली. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे महात्मा फुले चौक पोलिसांनी सांगितले. 

drunken youth Family bad over dispute over fireworks

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT