मुंबई

आता नवीन थिअरी, 5G मोबाईल टॉवर्समुळे वाढतोय कोरोना संसर्ग; जाणून घ्या व्हायरल सत्य असत्य

सकाळवृत्तसेवा

मुंबई: कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. आतापर्यंत जगात तब्बल ८० हजारपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. त्यामुळे लोकांमध्ये कोरोनाबद्दल प्रचंड भीती आहे. त्यात कोरोना कशामुळे पसरतो याबद्दलचे अनेक तर्क वितर्क आता लावले जातायत. कोरोना बाबाबत अनेक थेअरीज देखील बोलल्या जातायत. अशाच काही थेअरीज किंवा चुकीच्या तर्कवितर्कांमुळे आणि मुळात क्रोनच्या भीतीमुळे ब्रिटनमध्ये लोकांनी 5G मोबाईल टॉवर जाळून टाकलेत. 

कोरोना व्हायरस हा चीनकडून तयार करण्यात आलेलं एक बायोलॉजिकल म्हणजे जैविक शस्त्र आहे असा दावा करणारे व्हिडिओ किंवा पोस्ट तुम्ही सोशल मीडियावर पहिलेच असतील. यातच आता भर पडतेय. जशी कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढतेय तसतसे जगभरातून अनेक नवीन आणि अनोखे दावे करण्यात येतायत. आधुनिक 5G प्रणालीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढतो आणि रोगप्रतिकारक क्षमता यामुळे कमी होते असा दावा करण्यात आलाय. त्यामुळेच ब्रिटनमध्ये काही नागरिकांनी  थेट 5G चे मोबाईल टॉवर्सला लक्ष करत हे टॉवर्स थेट जाळून टाकलेत. 

खरं म्हणजे जगभरात सध्या 5G या नवीन आणि अत्याधुनिक इंटरनेट नेटवर्कची चाचणी करण्यात येतेय. यामुळेच कोरोना वाढतो आणि माणसाच्या शरीरातली रोग प्रतिकारक क्षमता कमी होते असं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे 5G  विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष बघायला मिळत आहे.

5G बद्दल आहेत २ प्रकारच्या कॉन्स्पिरसी थिअरीज :

  • सोशल मीडियावर 5G नेटवर्कमुळे कोरोना होतो हे व्हायरल झाल्यापासून निरनिराळ्या प्रकारच्या कॉन्स्पिरसि थिअरीज म्हणजे कट सिद्धांत आता समोर येत आहेत.
  • यात दोन प्रकारचे दावे करण्यात आले आहेत.
  • 5G  टॉवरच्या सिग्नलमुळे माणसाच्या शरीरातली रोग प्रतिकारक क्षमता कमी होते. त्यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढतो असं सांगण्यात येतंय.
  • तर काही लोकंच्या म्हणण्यानुसार 5G नेटवर्कमुळेच कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे असं बोललं जातंय.

यावर काय म्हणतात वैज्ञानिक:

5G  नेटवर्कमुळे कोरोनाचा संसर्ग वाढतो हा दावा धादांत चुकीचा आहे. वैज्ञानिकांचं  असं  म्हणणं आहे. तसंच 5G  नेटवर्कचा आणि रोगप्रतिकारक क्षमतेचा काहीही संबंध नाही असंही वैज्ञानिक म्हणतायेत. कुठल्याही नेटवर्कमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे असं आजपर्यंत स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असं वैज्ञानिक सांगतायेत.

due to 5G network towers novel corona virus is spreading check what is viral truth 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP-Shiv Sena alliance in Mumbai : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप अन् शिवसेनेचा जागा वाटपाचा फॉर्म्यूला जाहीर!

Guhagar-Vijaypur highway accident : गुहागर-विजयपूर महामार्गावर तामखडी नजीक भीषण अपघात; एक जण ठार तर सहाजण जखमी

Akola Municipal Election : अकोल्यात महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला; प्रचाराला वेग!

Bhandup Bus Accident :भांडुप स्टेशनजवळ 'बेस्ट बस'चा मोठा अपघात; चार ते पाच चिरडलं, दोन महिलांचा मृत्यू

Nashik Election: नाशिकमध्ये महायुतीचं फिस्कटलं! भाजपकडून प्रतिसाद नाही, दोन पक्षांनी घेतला 'हा' निर्णय

SCROLL FOR NEXT