मुंबई

मुंबईतील 'या' भागात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व शिथीलता रद्द...

सकाळवृत्तसेवा

मुंबई - बातमी मुंबईकरांची चिंता वाढवणारी. एकीकडे मुंबईत कोरोना डबलिंग समाधानकारकरीत्या आवाक्यात येतोय. तर दुसरीकडे मुंबईतील उत्तर मुंबई या भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. मुंबईतील उत्तर मुंबई हा भाग आता कोरोनाचा नवीन हॉटस्पॉट म्हणून समोर येतोय.

उत्तर मुंबईप्रमाणेच पश्चिम उपनगरांमध्ये देखील कोरोना रुग्ण झपाट्याने वाढताना पाहायला मिळतायत. याच पार्श्वभूमीवर उत्तर मुंबईतील जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता बाकी सर्व दुकानं आता बंद ठेवण्याचा BMC ने निर्णय घेतलाय.

महापालिकेकडून या भागातील अनेक इमारती या आधीच सील करण्यात आल्यात. मात्र या भागातील नियम तोडणाऱ्यांवर आणि आदेश धुडकावणाऱ्यांवर पालिका प्रशासन आता अत्यंत कडक कारवाई करणार आहे. उत्तर मुंबईत कांदिवली, मालाड, दहिसर आणि बोरिवली हा भाग येतो.  

कोरोना डब्लिंगचा रेट कुठे किती दिवस?  

  • कांदिवली 25 दिवस
  • मालाड 19 दिवस 
  • बोरिवली 18 दिवस 
  • दहिसर 15 दिवस 

आता मुंबई महापालिकेने मिशन उत्तर मुंबई हातात घेतलं आहे. या अंतर्गत आता दाटीवाटीचा भाग आणि झोपड्पट्टीमध्ये लॉकडाऊनचे कडक नियम पळाले जाणार आहेत. उत्तर मुंबईत एकूण ११५ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. यामध्ये ९०० पेक्षा अधिक इमारती या सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कंटेनमेंट झोन आणि सील केलेल्या इमारतींच्या भागांमध्ये जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद ठेवण्यात येणार आहेत.

कांदिवली, मालाड, दहिसर आणि बोरिवलीत कोरोना डबलिंग रेट हा १५ ते २० दिवस आहे त्यामुळे उत्तर मुंबईतील सर्व ११५ प्रतिबंधित क्षेत्र आणि सील केलेल्या इमारतींमधील नागरिकांवर विशेष लक्ष ठेवलं जाणार आहे.

दरम्यान ज्यांच्याकडून लॉकडाऊनचं पालन होणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचं BMC ने सांगितलंय.

due to increased covid19 patients strict lockdown rules will be followed in north maharashtra

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Corruption News : पैसा डबल करण्याच्या आमिषाला पोलिसही बळी; एसपींच्या आदेशानंतर अधिकाऱ्यांची नावे समोर, घटनेने खळबळ

Manikrao Kokate: १९९६ चा खटला… दिवंगत बापासाठी मुलगी लढली अन् न्याय मिळून दिला, माणिकराव कोकाटेंविरोधात लढलेल्या ॲड. अंजली दिघोळे...

VIDEO : 'गावातील अंबानी शेतकऱ्याचं घर'! 20 एकरातील आलिशान घर पाहून नेटकरीही थक्क; गाड्यांपासून घोड्यांपर्यंत सर्व काही इथे आहे...

Viral Video: किती गोड! आजोबांनी रेल्वेत आजीसाठी केलं असं काही... व्हायरल व्हिडिओ पाहून आनंदाश्रू उभे राहतील

'त्याने माझे खराब व्हिडिओ पोस्ट केले होते' सोशल मीडियाचा अनुभव सांगताना प्राजक्ता माळी म्हणाली...

SCROLL FOR NEXT