संग्रहित छायाचित्र 
मुंबई

अडीचशे वर्षांत प्रथमच : रमजानमध्ये महम्मद अली रोड सुना?

सकाळवृत्तसेवा

मुंबई : भीषण बॉम्बस्फोटांच्या मालिकेने मुंबईत जे काही घडवले नाही, ते कोरोनामुळे घडणार आहे. जवळपास अडीचशे वर्षांचा इतिहास असलेला जगप्रसिद्ध महम्मद अली रोडवरील स्ट्रीट फूड बाजार रमझानच्या महिन्यात बंद असेल असेच सध्या तरी दिसत आहे.

संतापजनक : चोरीसाठी 88 वर्षांच्या वृद्धाला बेदम मारहाण

मुंबई 12 मार्च 1993 रोजी बॉम्बस्फोटांनी हादरली होती. तरीही त्यानंतरच्या रमझान महिन्यात महम्मद अली रोडवरील फूड बाजार खुला होता. आता 23 एप्रिलपासून रमझानचा महिना सुरू होतोय. पण दरम्यानच्या काळात तो पूर्णपणे बंद राहणार का याचे उत्तर 3 मेच्या सुमारासच मिळेल.

रमजानचा महिना आल्यावर मुंबईतील खवय्यांना महम्मद अली रोड खुणावतो. मांसाहार प्रेमींसाठीची जवळपास 400 दुकाने थाटली जातात. तिथे जिभेची चोचले पुरवल्यानंतर त्यांचे पाय वळतात ते शेकड्यांनी असलेल्या लज्जतदार डेझर्टस्, सरबत आणि अन्य दुकांनाकडे. शीर-कुर्मा, फिरणी आदी विविध प्रकारच्या खाण्याचे शौकिन असलेल्यांसाठी एक उत्तम संधीच असते.

बिर्याणासाठी खानसामा लखनौहून येतो, दिल्लीतून निहारी आणि उत्तर प्रदेशातून तवा फूड स्पेशालिस्ट येतात. त्यामुळे येथील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी सुरत, भरूच, नाशिक, पुणे, सातारा आणि गोव्याहून खवय्ये आले नाहीत तरच नवल. महम्मद अली रोडची लोकप्रियता पाहून याच प्रकारचे रस्त्यावरील फूड बाजार मुंबईतील माहीम, कुर्ला, वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, मीरा रोड आणि वसईतच नव्हे तर पुणे, मालेगाव, नाशिक, सांगली, सुरत, दिल्ली व हैदराबादसारख्या अनेक ठिकाणी सुरू झाले आहेत, पण तरीही सच्च्या खवय्यांसाठी महम्मद अली रोडची सर कशालाच नसते.

महत्त्वाचं : सावधान! किराणा दुकानात मिळतोय निकृष्ट माल

पोलिस आयुक्तांची भेट घेणार
कोरोनामुळे दुकाने बंद राहणार आहेत. काय करणार? आम्ही मुंबई पोलिस आयुक्तांना भेटणार आहोत. त्यांना इफ्तारसाठी संचारबंदीतून किमान दोन तास सूट देण्याची विनंती करणार आहोत. सकाळच्या सेहरीच्या वेळी काही करता येईल, पण इफ्तार महत्त्वाचा आहे, असे अब्दुल रहमान खान यांनी सांगितले. खान हे महम्मद अली रोडवरील प्रसिद्ध `माशाल्ला कुझीन`चे मालक आहेत. मिनारा मशिदीजवळच `माशाल्ला कुझीन`पासूनच सर्वांची सुरुवात होते. 

फूड बाजाराच्या रुचकर आठवणी
बोहरा मोहल्ला परिसरातील सत्तर वर्षीय शब्बीर अजमानवाल्ला यांना महम्मद अली रोडवरील खाद्यपदार्थांचा आस्वाद न घेता सेहरी आणि इफ्तार अशी कल्पनाच सहन होत नाही. ते सांगतात, इथल्या फूड बाजाराबाबतच्या अनेक कहाण्या माझ्या आजोबांकडून ऐकल्या आहेत. आम्ही ट्राममध्ये फिरत महम्मद अली रोडवरील फूड बाजारातील पदार्थांचा आस्वाद घेतला आहे.

जिभेवर रेंगाळणारी चव...
महम्मद अली रोडवर फूड बाजाराचा इतिहास मिनारा मशिदीइतकाच जुना आहे. मशिदीच्या परिसरातच रमझानमध्ये सतत सुरू असणारा फूड बाजार सुरू झाला.  साठ-सत्तर वर्षांत त्याची नजाकत वाढत गेली. ते पदार्थ करण्याची आगळी पद्धत, जिभेवर रेंगाळणारी चव, जगभरातून येणारे खाद्यप्रेमी आदींमुळे त्याचे महत्त्व वाढत गेले, असे अनुभवी पत्रकार एजाझ अहमद अन्सारी सांगतात.

हेही वाचा : `ते` का म्हणतात माॅर्निंग वाॅक नको रे बाबा

परदेशी नागरिकही वाढले
महम्मद अली रोडवरील फूड बाजाराची लोकप्रियता सतत वाढत आहे. आता रमजानच्या महिन्यात खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणाऱ्यात 60 टक्के बिगर मुस्लिम आणि 15 टक्के परदेशी नागरिक असतात, याकडे करीम पटेल लक्ष वेधतात. काही पदार्थ केवळ रमजानच्या महिन्यातच तयार केले जातात. त्यामुळेच तर खवय्यांची जास्त गर्दी होते. अनेक दुकानांतील काही पदार्थ खास असतात, असे त्यांनी सांगितले. 

फूड बाजार नसणार याची खंत
आता रमजानच्या महिन्यात यंदा महम्मद अली रोडवरील फूड बाजार नसणार याची खंत अनेकांना आहे. परिसरात रमजानच्या महिन्यात रोज सरासरी 40 हजार जण किमान येतात. शनिवारी-रविवारी ही संख्या लाखापर्यंत जाते. प्रत्येक जण सरासरी पाचशे ते आठशे रुपये खर्च करतो. त्यातील अनेक कुटुंबे तर केवळ रमजानचा एकच महिना काम करतात आणि त्यावर वर्षभर गुजराण करतात. एका स्टॉलवर किमान दहा जण कामाला असतात. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT