मुंबई

कामगारांच्या स्थलांतरामुळे चित्रपटसृष्टीवर होणार मोठा परिणाम

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई ः चित्रपटसृष्टीमध्ये लाईटमन, हेल्पर, स्पाॅटबाॅय अशी कामे करणाऱ्या कामगारांना आता रोजगारच उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी आपापल्या गावी जाणे पसंत केले आहे. आता हे कामगार गावावरून पुन्हा कधी परत येतील हे काही सांगता येत नाही. मात्र या कामगारांच्या अशा प्रकारे स्थलांतर करण्याच्या निर्णयामुळे त्याचा चित्रपटसृष्टीवर मोठा परिणाम होणार आहे. चित्रीकरण सुरू करण्याचा निर्णय झाला तरी कामगारांअभावी पंचाईत होणार आहे.

सध्या कोरोनामुळे चित्रपटसृष्टी ठप्प झाली आहे. चित्रीकरण संपूर्णपणे बंद आहे. येथे हातावर पोट असणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे लाईटमन, इस्त्रीवाला वगैरे विभागामध्ये काम करणारे कामगार हे बहुतांशी उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड येथील आहेत. हे सगळे कामगार दैनंदिन मजुरीवर काम करीत असतात. परंतु गेला दीड महिना त्यंना काहीच काम नाही. शिवाय चित्रीकरण कधी सुरू होणार याचा काही भरवसा नाही. चित्रीकरण सुरू होणे आणखीन काही काळ लांबले तर त्यांना जगणे कठीण होऊन बसेल. कारण त्यांच्या हातात असलेला पैसा आताच संपलेला आहे. नोकरीची गॅरंटी नसल्यामुळे उधार किंवा उसनवारी कुणी देत नाही. त्यामुळे येथेच आता या कामगारांना काहीच काम नाही. त्यामुळे येथे निवांत बसण्यापेक्षा आपल्या गावी जावे आणि तेथे काही करता येते का ते पाहावे या हेतूने त्यांनी आता गावचा रस्ता धरला आहे. सध्या सरकारनेही विविध कामगारांना आपापल्या राज्यात पतरण्याची परवानगी दिली आहे.

चित्रपटसृष्टीतील अनेक कामगारांनी आपल्या घरचा रस्ता धरला आहे आणि आता हे कामगार पुन्हा कधी येणार हे सांगता येत नाही. याबाबत इम्पाचे संचालक अशोक पंडित म्हणाले, की जवळपास ५० ते ६० टक्के कामगार हे बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड येथील असतात आणि यातील बहुतेक कामगार हे अनुभवी असतात. आता त्यांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे चित्रपटसृष्टीवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. सरकार परवानगी देईल तेव्हा चित्रीकरण सुरू होईल. चित्रीकरण सुरू झाल्यानंतर कामगार जरी मिळाले तरी त्यांना अनुभव कितीसा असेल असा प्रश्न आहे. मात्र अशा अनुभवी कामगारांची कमतरता भासणार आहे.  

स्पाॅटबाॅट प्रदीप स्वाय म्हणाला, की 'मी ओरिसाचा आहे आणि येत्या आठवड्यात मी माझ्या गावी जाणार आहे. येथे आता राहून काहीही उपयोग नाही. कारण येथे उपाशी राहावे लागणार आहे. आमच्या संघटनेने काही थोडी फार मदत केली. पण आता ती संपलेली आहे. दोन महिने झाले आहेत  आणि काहीही काम नाही माझ्याबरोबर आणखीन सात ते आठ जण चित्रपटसृष्टीत काम करणारे राहतात आणि तेदेखील आपापल्या गावी जाणार आहेत. चित्रीकरण कधी सुरू होईल याचा नेम नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT