मुंबई

नेटफ्लिक्सच्या दोन दिवसाच्या विनामूल्य सेवेमुळे OTT प्लॅटफॉर्म्समध्ये वाढणार चुरस

संतोष भिंगार्डे

मुंबई : नेटफ्लिक्सने आपले भविष्यातले सबस्क्राईबर्स वाढविण्यासाठी आज (ता. ५) आणि उद्या (ता. ६)  भारतात 'स्ट्रीमफेस्ट'चे आयोजन केले आहे. या स्ट्रीमफेस्टच्या माध्यमातून नॉन सबस्क्राईबर्सना नेटफ्लिक्स दोन दिवस विनामूल्य सेवा पुरविणार आहे. याचा पुरेपूर फायदा प्रेक्षक उचलताना दिसत आहेत. मात्र यामुळे ओटीटी प्लॅटफाॅर्मवर विनामूल्य सेवा देण्याची स्पर्धा अधिक तीव्र होणार असल्याचे दिसते आहे. अन्य प्लॅटफाॅर्मदेखील असेच एखादे पाऊल उचलून आपले सबस्क्राईबर्स वाढविण्याचा प्रयत्न भविष्यात नक्कीच करतील अशी चिन्हे दिसत आहेत.  

गेल्या तीन-चार वर्षांत आपल्या देशात ओटीटी प्लॅटफॉर्म हे एक प्रभावी माध्यम तयार झाले आहे. सध्या नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, हॉटस्टार, सोनी लिव्ह, झी 5, वूट असे विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्स उत्तमोत्तम कलाकृती निर्माण करून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याच्या शर्यतीत उतरले आहेत. या शर्यतीत पुढे जाण्यासाठी प्रत्येक जण नवनवीन कल्पना वापरताना दिसतात. लाॅकडाऊनच्या काळात हे माध्यम अधिक सशक्त झाले. अनेक हिंदी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले. त्यामुळे एक प्रकारची स्पर्धा पाहायला मिळाली. त्यातच आता नेटफ्लिक्सने आपले भविष्यातले सबस्क्राईबर्स वाढवण्यासाठी भारतात दोन दिवस 'स्ट्रीमफेस्ट'चे आयोजन केले. या स्ट्रीमफेस्टच्या माध्यमातून नॉन सबस्क्राईबर्सना नेटफ्लिक्स दोन दिवस विनामूल्य सेवा पुरविणार आहे. याचा पुरेपूर फायदा प्रेक्षक उचलताना दिसत आहेत.

द ऑफिस, द क्राऊन, ल्युसीफर, मनी हाईस्ट, डार्क अशा परदेशी सिरीज तसेच दिल्ली क्राईम, शी, लिटिल थिंग्स अशा भारतीय सिरीज आणि नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेले प्रसिद्ध हॉलीवूड चित्रपट यांच्यावर प्रेक्षक तुटून पडले आहेत. पहिल्या दिवशी संध्याकाळपर्यंत भारतात असंख्य युजर्सनी नेटफ्लिक्स वापरल्याचे स्पष्ट झाले असून हा आकडा दुसऱ्या दिवशी आणखी वाढणार आहे.  

याबाबत लेखक आणि दिग्दर्शक सचिन दरेकर म्हणाला, की भारतातील सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचता यावे याकरिता नेटफ्लिक्सने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता अन्य ओटीटी प्लॅटफाॅर्मदेखील काही तरी नवीन कल्पना राबवतील हे निश्चित. अलीकडे अमुक एखाद्या कंपनीचे सीमकार्ड घेतले तर अमुक ओटीटी प्लॅटफाॅर्म एक महिना मोफत अशा योजना अधेमधे असतात. परंतु आता ही स्पर्धा आणखीन वाढेल. कारण भविष्यात हा प्लॅटफाॅर्म आपल्याकडे भक्कम पाय रोवणार आहे आणि त्याकरिता त्यांना अशा काही कल्पना राबवाव्या लागणारच.

( संपादन - सुमित बागुल )

due to netflix stream fest competition between OTT platforms may increase

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soldier funeral: ११ महिन्यांच्या चिमुकल्यामुळे मने हेलावली! जवान अर्जुन जाधव यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप, शहापूरवर शोककळा

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १३ जून २०२६ ते १९ जून २०२६ - मराठी राशी भविष्य

स्वाभिमान, अभिमान व अहंकार : संत एकनाथ महाराज

आजचे राशिभविष्य - 13 जून 2026

DCM Sunetra Pawar : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश

SCROLL FOR NEXT