मुंबई

सध्या तुरुंगात जे कैदी आहेत त्यांना चक्क दिली जातेय 'धुरी', वाचा प्रकार नेमका आहे काय ?

सकाळवृत्तसेवा

मुंबई: राज्यभरातील तुरुंगांमधील कैद्यांचे कोरोनापासून रक्षण करण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना सुरू केल्या आहेत. कैद्यांना हळदीचे दूध, आले-लिंबाचा चहा, क जीवनसत्त्व आणि होमिओपॅथी गोळ्या दिल्या जातात. त्यांच्याकडून योगासने करून घेतली जातात; तसेच गाईच्या शेणाची धुरी देऊन वातावरण जंतुविरहीत करण्यात येते, अशी माहिती राज्य सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे.

उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकांवर तुरुंग विभागाने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. राज्यभरातील तुरुंगांत केल्या जात असलेल्या कोरोना प्रतिबंधक उपायांची माहिती सरकारने दिली आहे. येरवडा तुरुंगात निर्जंतुकीकरणााठी कडुनिंब आणि शेणाची धुरी दिली जाते. स्नानासाठी दिल्या जाणाऱ्या पाण्यात कडुनिंबाचा पाला टाकला जातो. मागील महिन्यात योग केंद्राकडून होमिओपॅथी गोळ्या पुरवण्यात आल्या होत्या.

ठाणे पोलिस आयुक्तांनी आयुष मंत्रालयाकडून मागवलेल्या होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप तुरुंगातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कैद्यांनाही करण्यात आले. सर्व तुरुंगांतील कॅंटीनमध्ये हळदीचे दूध, संत्री, मोसंबी लिंबू अशी फळे, आले-लिंबाचा चहा आदी पदार्थ उपलब्ध करण्यात आले आहेत. मास्क, सॅनिटायझर, हातमोजे, साबणाचे वाटप करण्यात आले आहे. या वस्तू सामाजिक संस्थांंकडून ना नफा तत्त्वावर मिळतात. काही ठिकाणी कैदीही मास्क बनवत असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

सर्वतोपरी काळजी

तुरुंगांमधील 50 वर्षांवरील कैद्यांना स्वतंत्र काम दिले जात असून, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला असे गटही तयार केले आहेत. सोशल डिस्टन्सिंगमुळे कैदी कोणाला भेटू शकत नसले, तरी व्हिडीओ कॉलद्वारे ते कुटुंबीयांशी संपर्क साधू शकतात. मानसिक स्वास्थ्य ठीक राहावे म्हणून त्यांचे समुपदेशनही केले जाते. कैद्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

during corona virus pandemic prisoners are getting turmeric milk and lemon and ginger tea

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT