mumbai police. 
मुंबई

लॉकडाऊन दरम्यान दीड हजार वाहनचालकांवर कारवाईचा बडगा, लाखो रुपयांचा दंड वसूल

सकाळवृत्तसेवा

अलिबाग : रायगड जिल्ह्यात वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एक हजार 543 वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. 

जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, रोहा, माणगाव, महाड तालुका, महाड शहर, महाड एमआयडीसी, कर्जत, पाली, नागोठणे, कोलाड, रेवदंडा, मांडवा सागरी, पोयनाड, म्हसळा, श्रीवर्धन, दिघी सागरी, रसायनी, नेरळ, खोपोली, खालापूर, माथेरान आदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय, राज्य महामार्गासह, जिल्हा, तालुका मार्ग तसेच नाक्यानाक्यावर वाहतूक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. हेल्मेट नसणे, वाहन वेगात चालविणे, टीबल शीट असणे, ज्यादा प्रवासी घेऊन वाहतूक करणे अशा अनेक वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत तीन लाख 77 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

शनिवारी 791 वाहनचालकांविरोधात कारवाई करून त्यांच्याकडून 1 लाख 95 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. तसेच रविवारी 751 वाहनचालकांविरोधात कारवाई करून 1 लाख 81 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

During the lockdown, action was taken against one fifty thousand drivers

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Free Trade Deal: मोठी आर्थिक घडामोड! व्हिस्की, लक्झरी कारसह अनेक वस्तू होणार; ग्राहकांना दिलासा मिळणार, पण कधीपासून?

IND vs ENG Women Test : भारताविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; ५ नव्या चेहऱ्यांना संधी

Vegetable Rate Hike : पावसाचे आगमन लांबले; भाजीपाला महागला! आवक ४० टक्क्यांनी घटली; मेथी, भेंडी, पालक, वांगीही तेजीत

Bullet Train: भारतच पुढची बुलेट ट्रेन उभारणार! मुंबईहून पुण्यात अवघ्या ४८ मिनिटांत पोहोचणार; कामाला सुरुवात कधी होणार?

'तो फोनवर घाणेरडं बोलत होता' अमृता खानविलकरने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली...'निनावी नंबरवरून कॉल आला अन्...'

SCROLL FOR NEXT