मुंबई

बेस्टच्या मदतीला धावणार ST, नागरिकांच्या सोयीसाठी मुंबईत 1 हजार बसेस धावणार

समीर सुर्वे

मुंबई : मुंबईतील नोकरदारांना लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण मुंबईत राज्य परीवहन महामंडळाच्या 1 हजार बसेस बेस्टच्या बरोबरीने धावणार आहेत. त्यामुळे रस्त्यावरील रोजच्या बसेसची संख्या साडेचार हजारच्या पुढे जाणार आहे.

लोकल बंद असताना मुंबईतील व्यवहार मोठ्या प्रमाणात सुरु होत आहे. त्यामुळे बेस्टवरील भार वाढत असताना सोशल डिटन्सिंगमुळे बसेसमधील प्रवाशांची क्षमता निम्यावर आली आहे. यामुळे वर्दळीच्यावेळी बस मिळण्यासाठी दिड ते दोन तासांची प्रतिक्षा केली जाते. यावर उपाय म्हणून बेस्ट प्रशासनाने एसटीच्या 1 हजार बसेस भाडेतत्वावर वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकित बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी ही माहिती दिली.

बेस्ट बसेसचे नियोजन पुर्ण व्यवस्थापन करावे असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. सकाळने 18 ऑगस्ट रोजी मुंबईतील बेस्ट प्रवाशांची व्यथा टूडे पुरवणीत मांडली होती. त्यावेळी बेस्टने एसटीच्या बसेस भाड्याने घेण्याचा पर्याय सुचवला होता.

बेस्टने एसटीच्या 75 बसेस भाड्याने घेतल्या असून सध्या रोज रस्त्यावर साडेतीन हजारहून अधिक बसेस रस्त्यावर असतात.तर रोज 16 लाख प्रवासी प्रवास करत आहे. या 1 हजार बसेस बेस्टच्या ताफ्यात आल्यास त्याचा फायदा किमान 4 ते 5 लाख प्रवाशांना होण्याचा शक्यता आहे.सध्या वर्दळीच्या वेळी बेस मिळण्यासाठी किमान दिड ते दोन तासांचा कालावधी लागतो. प्रवास एक ते दिड तासाचा असताना बसच्या रांगेत दुप्पट वेळ लागत आहे. तर, डेपोमध्येेच बस पुर्ण भरत असल्याने मधल्या थांब्यांवरील प्रवाशांचे अधिक हाल होतात.

( संपादन - सुमित बागुल ) 

to ease pressure on BEST state transport to run more than 1000 buses to mumbai  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

SCROLL FOR NEXT