मुंबई

ED ने तयार केला कोठडी अहवाल, प्रताप सरनाईक यांच्या अडचणी वाढणार ?

सुमित बागुल

मुंबई : ED ने सुरु केलेली प्रताप सरनाईक यांची चैकशी सरनाईक यांना भोवणार अशी चिन्ह दिसतायत. कारण मिळालेल्या माहितीनुसार अंमलबजावणी संचनालयानंआतापर्यंत केलेल्या तपासानंतर ED कोठडी अहवाल तयार केलाय अशी माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अहवालात प्रताप सरनाईक यांच्यावर काही गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. कालच ED कडून प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चंडोळे यांना अटक देखील करण्यात आली आहे.

दरम्यान, ED ने न्यायालयात जो कोठडी अहवाल सादर केलाय त्यामध्ये थेट प्रताप सरनाईक यांचे नाव घेतले गेलेय असंही समजतंय. MMRDA मधील बनावट टॉप्स सुरक्षारक्षकांची निम्मी रक्कम देखील प्रताप सरनाईक यांना जात होती, असाही दावा इडीने न्यायालयासमोर केला आहे. 

काय आहेत हे गंभीर आरोप 

राहुल नंदा आणि अमित चंडोळे यांची भेट प्रताप सरनाईक यांनी घडवून आणली होती. MMRDA चे सुरक्षारक्षकांचे टेंडर निघण्यापूर्वी या टेंडर्समधून 50 टक्के नफा प्रताप सरनाईकांना दिला जाईल असे तोंडी व्यवहार ठरले होते. मुंबईतील सर्व उड्डाणपुलांवर सुरक्षा रक्षक आणि ट्रॅफिक मार्शल पुरवण्याचे MMRDA चे कंत्राट टॉप्स ग्रुपला मिळाले होते. ज्यासाठी प्रत्येक महिन्याला साधारण ३२ ते ३३ लाख रुपये MMRDA denar होती. पैसे ५०-५० टक्के प्रॉफिट शेअरिंग नुसार टॉप्स आणि सरनाईक यांच्यात विभागले जातील असंही ठरलं होतं. त्यासाठीचे पैसे सरनाईकांसाठी अमित चंडोळे यांच्याकडून रोख रक्कमेत स्वीकारले जायचे. MMRDA आणि टॉप्स ग्रुपमध्ये जे व्यवहार व्हायचे त्या व्यवहारातील 50 टक्के रक्कम राहुल नंदा आणि प्रताप सरनाईक यांना ठरलेल्या करारापलीकडे रोख किंवा इंटरनेट बँकिंग स्वरूपात दिली जायची. MMRDA सुरक्षारक्षक कंत्राटामधील 30 टक्के बनावट सुरक्षा रक्षकांमधील 50 टक्के हिस्सा अमित चंडोळेकडून घेतला जायचा जो की प्रताप सरनाईक यांचा आहे असं टॉप्स ग्रुपचे उपाध्यक्ष रमेश अय्यर यांना टॉप्स ग्रुपचे मालक राहुल नंदा यांनी सांगितले होते. 

दरम्यान येत्या काळात हे प्रकरण काय वळण घेतं यावर सर्वांचं लक्ष आहे.

ED investigation pratap sarnaik closet report tops group rahul nanda MMRDA

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Semifinal: ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस! शफली वर्माचे पुनरागमन, पण कांगारूंच्या ताफ्यात शतक करणारी कर्णधारही परतली; पाहा Playing XI

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा निर्णय; भारतीयांच्या नोकऱ्या धोक्यात, आजपासूनच नियम लागू

Viral Video : 52 व्या वर्षी महिमा चौधरीने दुसऱ्यांदा केलं लग्न ? व्हिडीओ झाला व्हायरल, जाणून घ्या सत्य

Bombay High Court: फक्त शिवीगाळ म्हणजे गुन्हा नाही : हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Pune Land Dispute : धर्मादाय आयुक्तांकडून पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश, बिल्डरच्या २३० कोटींबाबत महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT