raj kundra 
मुंबई

कुंद्राच्या अडचणी वाढणार?; पोर्नोग्राफी प्रकरणात EDच्या एन्ट्रीची शक्यता

FEMA अंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज कुंद्राशी संबंधीत पोर्नोग्राफी रॅकेट प्रकरणात आता अंमलबजावणी संचालनालयानं अर्थात EDची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. आर्थिक घोटाळा प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) आणि फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट अतंर्गत याप्रकरणात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराच्या अँगलच्या चौकशीसाठी या केंद्रीय एजन्सीला कळवलं आहे. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. (ED may file case against Raj Kundra for financial irregularities aau85)

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक झालेल्या राज कुंद्राशी संबंधीत पुरावे समोर आल्यानंतर ईडी तपास हाती घेण्याची शक्यता आहे. ईडीच्या सुत्रांच्या माहितीनुसार, तपास एजन्सी मुंबई पोलिसांकडून या केसची FIR मागवून घेऊन खटला दाखल करणार आहे. राज कुंद्राला FEMA अंतर्गत नोटीस किंवा समन्स बजावलं जाऊ शकतं. या प्रकरणी कंपनीच्या संचालकांची देखील चौकशी केली जाऊ शकते. तसेच यामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा हात असल्याचं निदर्शनास आल्यास तिचीही चौकशी केली जाऊ शकते.

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रावर पोर्नोग्राफी रॅकेट चालवल्याचा आरोप आहे. याप्रकरणात भारत आणि युके दरम्यान पैशांची देवाण घेवाण झाल्याचंही पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. राज कुंद्रा आणि त्याची कंपनीचे 'येस बँक' आणि 'युबीए' खात्यांमध्ये व्यवहारांची चौकशी होणार आहे. ईडी FEMA च्या नियमांतर्गत चौकशी करणार आहे.

राज कुंद्रा २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत राहणार

राज कुंद्रा आणि त्याचा आयटी प्रमुख रयान थॉर्प २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहे. मुंबई पोलिसांनी आत्तापर्यंत राज कुंद्रासह १० लोकांना पोर्नोग्राफी निर्मितीतील कथीत सहभाग आणि त्यांना मोबाईल अॅपच्या माध्यमातून प्रसारित करण्याच्या आरोपांखाली अटक केली आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, मुंबई पोलिसांची टीम शुक्रवारी राज कुंद्राला घेऊन शिल्पा शेट्टीच्या घरी छापेमारी आणि चौकशीसाठी गेली होती. राज्य कुद्रांवर आरोप आहे की, त्यानं लंडनमधील एका कंपनीसोबत करार केला असून ही कंपनी मोबाईल अॅप हॉटशॉट्सच्या माध्यमातून अश्लील कंटेंट स्ट्रिमिंगमध्ये सहभाग होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

योग गुरूचा १७ वर्षीय मुलीसह ८ महिलांवर अत्याचार, अल्पवयीन पीडितेनं दिलेल्या तक्रारीनंतर सगळा प्रकार उघडकीस

Maharashtra Health Alert: राज्यात असंसर्गजन्य आजारांचा धोका; मधुमेह, दमा, स्थूलतेच्या प्रमाणात वाढ

Big Revelation in Tharla Tar Mag: ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट! सायलीच खरी तन्वी! अर्जुनला सत्यासाठी पोहचला थेट बायकोच्या शाळेत

Girish Mahajan : ठाकरे ब्रॅन्ड नामशेष झाला, आगामी निवडणुकीत बॅन्ड वाजणार; गिरीश महाजन यांची घणाघाती टीका

Pimpri News : नागरी सुविधा केंद्राला मुदतवाढ, नव्या निविदा प्रक्रियेपर्यंत अप्पर तहसीलमध्ये सेवांचा पुरवठा सुरूच

SCROLL FOR NEXT