bmc scam sakal
मुंबई

BMC Scam: बीएमसी उपायुक्त बिरादार यांच्या घरी ईडीची छापेमारी; 12 तासानंतरही झाडाझडती सुरूच

आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्या रमाकांत बिरादार यांच्या घरी ईडीने धाड टाकली

अंकिता खाणे (Ankita Khane)

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण आणि खासदार संजय राऊतांचे पार्टनर सुजीत पाटकर या दोघांच्याही घरी काल ईडीने धाडी टाकल्या. त्यानंतर मुंबई पालिकेतील उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्या घरी ईडीची छापेमारी करण्यात आली आहे. कोरोना काळातील कथित घोटाळा प्रकरणांमध्ये या धाडी टाकण्यात आल्याची माहिती आहे. या धाडसत्रामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई महापालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्या घरी ईडीने छापे टाकले आहेत. कोव्हिड काळातील कथित घोटाळ्याप्रकरणी ही धाड टाकण्यात आली आहे. रमाकांत बिरादार हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. काल या प्रकरणी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण तसेच आत्तिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या घरी धाडी टाकण्यात आल्या होत्या.

मुंबई महापालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्या घरावर ईडीने सकाळी धाड टाकली आहे. गेल्या 12 तासांपेक्षा जास्त काळापासून त्यांची चौकशी सुरू आहे. कोविड काळातील कथित घोटाळा प्रकरणांमध्ये या धाडी टाकण्यात आल्याची माहिती आहे. मुंबई महानगरपालिकेचे माजी वरिष्ठ अधिकारी संजीव जयस्वाल आणि इतर महानगर पालिका अधिकाऱ्याच्या घरीही ईडीची छापेमारी करण्यात आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?

कोरोना काळात मुंबईमध्ये अनेक कोविड सेंटर उभारण्यात आले होते. मुंबईतील दहिसर येथे असेच एक कोविड सेंटर स्थापन करण्यात आलं होतं. संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांनी हे कोविड सेंटर बांधलं असल्याचा आरोप वारंवार केला जातो. या कामासाठी सुजित पाटकर यांनी रातोरात कंपनी स्थापन केली. ज्याला लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस असं नाव देण्यात आलं होतं असं बोललं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: कोंढवे धावडे परिसरात मुसळधार पावसाने महापालिकेच्या व्यवस्थापनातील त्रुटी उघड

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

SCROLL FOR NEXT