मुंबई

संजय राऊत यांच्या पत्नीला ईडी कडून समन्स; 29 तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश

तुषार सोनवणे

मुंबई -  शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावली आहे. याप्रकरणी त्यांना मंगळवारी (ता. 29) ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आल्याची माहिती ईडी अधिकाऱ्याने दिली. 

पीएमसी बॅंक गैरव्यवहारप्रकरणी काही संशयित बॅंक व्यवहार आहेत. त्यांची पडताळणी करण्यासाठी राऊत यांची चौकशी करणार आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. कलम 67 अंतर्गत ही नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. पीएमसी बॅंक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून काही जणांची चौकशी सुरू आहे. याच पार्श्‍वभूमीवर एका जुन्या प्रकरणाच्या चौकशीत वर्षा राऊत यांचे नाव समोर आल्याने त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. ईडीचे संचालक एस. के. मिश्रा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या अगोदर महाविकास आघाडीच्या नेत्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. त्यावरून संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. आता त्यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्याने संजय राऊत नेमकी कशी भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

शिवसेना नेत्यांमध्ये चर्चा 
दरम्यान, भोसरीतील भूखंडाच्या व्यवहारासंदर्भात ईडीने माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना नोटीस दिली आहे. ते ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार असून, त्यासाठी बुधवारी (ता. 30) मुंबईला जाणार आहोत, अशी माहिती खडसे यांनी दिली. खडसेंना ईडीची नोटीस बजावण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती, तर दुसरीकडे या नोटिसीमुळे शिवसेना नेत्यांमध्ये चर्चांना ऊत आला आहे.

------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Dhananjay Mahadik Criticises Rahul Gandhi : धनंजय महाडिकांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, 'निवडणूक आयोगाबद्दल चुकीची माहिती पसरवून दिशाभूल सुरू'

ICC Cricket World Cup 2027: वर्ल्ड कप 2027 चं शेड्यूल कधी जाहीर होणार? अनाउन्समेंटची तारीख समोर; जाणून घ्या कुठे होणार घोषणा

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Gokul Election Heat in Kolhapur : 'गोकुळ'ची धामधूम असतानाही आलात त्याबद्दल तुमचे आभार; मंत्री मुश्रीफांकडून सतेज पाटील यांचा चिमटा

SCROLL FOR NEXT