मुंबई

लॉकडाऊनचा इफेक्ट, यावर्षी मुंबईतील ड्रग्सच्या केसेसमध्ये कमालीची घट

अनिश पाटील

मुंबई: कोरोना संकटामुळे शहरात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत दाखल गुन्ह्यांतही घट झालेली पाहायला मिळत आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत मुंबईत केवळ 2720 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ड्रग्ससंबधीत 10 हजारांहून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यात सेवन आणि विक्रीच्या गुन्ह्यांचा सहभाग आहे.

यावर्षी मुंबई पोलिसांनी एनसीपीएस कायद्या अंतर्गत 2720 गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्यात 15 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आल्या अंमली पदार्थांमध्ये 12 कोटी 53 लाखांचे हेरॉईन, 33 लाखांचे चरस, 10 लाखांचे कोकेन, एक कोटी 29 लाख रुपयांचा गांजा, 65 लाख रुपयांचा मेफेड्रॉन, दोन लाख 40 हजारांचे एलएसडी जप्त करण्यात आले आहेत. 

यावर्षी ड्रग्स सेवनाच्याही 2503 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत 10 हजार 394 गुन्हे मुंबई पोलिसांनी दाखल केले होते. त्यात 64 कोटी 64 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. कोरोना संकटामुळे देशभर लॉकडाऊन करण्यात आले होते. सुरूवातीच्या काळात मुंबईतही मोठ्याप्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे मुंबई पोलिसांनी सर्वत्र बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात ड्रग्स तस्करीला काही प्रमाणात आळा बसला होता.
 
अधिक वाचाः  ST महामंडळाचा मोठा निर्णय; आगार तारण ठेवून घेणार २ हजार कोटींचं कर्ज

एनसीबीच्या रेकॉर्ड ब्रेक कारवाईकडे वाटचाल

सुशांत सिंग प्रकरणातील ड्रग्स तस्करीप्रकरणी तपास करणा-या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने यावर्षी आतापर्यंत 30 गुन्ह्यांची नोंद केली आहे. गेल्यावर्षी एनसीबीच्या मुंबई विभागाने संपूर्ण वर्षभरात 33 गुन्ह्यांची नोंद केली होती. हा त्यांचा उच्चांक असून तो यावर्षी मोडण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी एनसीबीच्या मुंबई युनिटने 2018 मध्ये 21 आणि 2017 मध्ये 25 गुन्ह्यांची नोंद केली होती.

---------------------

(संपादनः पूजा विचारे)

The effect lockdown dramatic drop in nostrum cases in Mumbai this year

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT