Thane municipal corporation budget
Thane municipal corporation budget  sakal media
मुंबई

ठाणे पालिकेच्या अर्थसंकल्पात ८५ कोटींची वाढ; दहा योग केंद्र उभारणार

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या (Thane municipal corporation) मूळ अर्थसंकल्पात स्थायी समितीने ८५ कोटी रुपयांची वाढ सुचविली आहे. त्यामुळे सन २०२२-२३ चे अंदाजपत्रक (Budget) ३,३८४ कोटींच्या घरात गेले आहे. दुसरीकडे अंदाजपत्रकात महसुली खर्चात ४० कोटी ५२ लाख, तर भांडवली खर्चात ४४ कोटी ४८ लाखांची वाढ सुचविण्यात आली आहे. ठाणे पालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा (Dr vipin Sharma) यांनी कोणतीही करवाढ, दरवाढ नसलेला २०२२-२३ चा ३,२९९ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती संजय भोईर यांच्याकडे सादर केला होता.

गेल्या वर्षी १,३०० कोटी तुटीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत यंदा मात्र ५४५ कोटींनी वाढ झाली आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदाही नव्या मोठ्या प्रकल्पांची घोषणा न करता पालिकेवरील दायित्व कमी करण्यावर भर देण्यात आला. स्थायी समितीने अर्थसंकल्पात काही महत्त्वाचे बदल सुचवले आहेत. शहर विकास विभागाकडून प्रशासनाने ५०० कोटी ४२ लाख उत्पन्न अपेक्षित धरले होते. त्यातच या मूळ अर्थसंकल्पात स्थायी समितीने ८५ कोटींची वाढ सुचवली असून यामध्ये प्रामुख्याने शहर विकास विभागाकडून वाढीव उत्पन्न अपेक्षित धरले आहे. त्यामुळे आता अर्थसंकल्प ३,३८४ कोटींवर पोहोचला आहे.

१० योग केंद्र उभारणार

अर्थसंकल्पात वाढ सुचविण्यात आलेल्या महसुली खर्चामध्ये प्रामुख्याने इमारतींच्या दुरुस्तीसाठी २ कोटी ५० लाख, बीएसयूपी झोपडीधारकांना भाडे देण्यासाठी ५० लाख, जलवाहिन्या व जलकुंभ दुरुस्तीसाठी १ कोटी, स्मार्ट मीटर देखभाल दुरुस्तीसाठी ३ कोटी, मलवाहिन्या देखभाल व दुरुस्तीसाठी १ कोटी व महापालिका शाळांमध्ये १० योग केंद्र सुरू करण्यासाठी ५० लाख इत्यादींचा समावेश आहे.

महसुली कामे खर्च

मोबाईल डायग्नॉस्टिक व्हॅन १ कोटी
महापौर चषक क्रीडा स्पर्धा १ कोटी
पशुजन्म नियंत्रण योजना १ कोटी
बागांची निगा व देखभाल १ कोटी
जंतुनाशके ५० लाख

रस्त्यांसाठी सर्वाधिक खर्च

सन २०२२-२३ मधील वाढ सुचविण्यात आलेल्या भांडवली कामांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी १ कोटी ७६ लाख, विकास आराखड्यातील रस्ते नूतनीकरणासाठी ३ कोटी, यूटीडब्ल्यूटी रस्त्यांसाठी १० कोटी ५० लाख इत्यादी प्रमुख बाबींमध्ये वाढ सुचविण्यात आली आहे.

भांडवली कामे खर्च

सार्वजनिक शौचालये ४ कोटी
उद्यान विकास कार्यक्रम २ कोटी
मैदान विकास २ कोटी
अभ्यासिका उभारणी १ कोटी
बहुउद्देशीय इमारत बांधणी १ कोटी

महिलांसाठी स्वतंत्र कक्ष

महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र कक्ष तयार करून खोली 'तिच्यासाठी" ही संकल्पना राबविण्यासाठी, सार्वजनिक शौचालय बांधण्यास ५० लाख रुपयांची तरतूद राखून ठेवण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

केदार जाधवने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून केली निवृत्तीची घोषणा

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

SCROLL FOR NEXT