मुंबई

मुंबईत लागणाऱ्या आगींपैकी 80 टक्के आगी सदोष विद्युत यंत्रणेमुळे

समीर सुर्वे

मुंबई, ता. 8 : मुंबईत लागणाऱ्या आगींपैकी 80 टक्के आगी या सदोष विद्युत यंत्रणेमुळे लागत असल्या तरी इमारतींमधील वायरींगची तपासणी करण्याचे अथवा ऑडीट करुन घेण्याचे अधिकार महानगर पालिका अथवा मुंबई अग्निशमन दलाकडे नाही. त्यामुळे डोळ्याने लटकत असलेल्या वायर्स दिसत असल्या तरी कारवाई करता येत नाही अशी खंत प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

इमारतींमधील अंतर्गत अग्निशमन यंत्रणेचे परवनाधारक ऑडीटरकडून ऑडिट करुन त्याचा अहवाल अग्निशमन दलाला सादर करायचा असतो. मात्र, इंडियन इलेक्ट्रीक कायद्यानुसार दर पाच वर्षांनी सर्व प्रकारच्या इमारतींमधील वायरिंगचे ऑडीट होणे बंधनकार आहे. यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. महापालिका अथवा अग्निशमन दलाकडे ही जबाबदारी नसल्याने त्या कायद्यानुसार कारवाई करता येत नाही अशी खंत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईतील 80 टक्क्याहून जास्त आगी या शॉर्ट सर्किटमुळे लागतात. सदोष विद्युत प्रणालीच हे आगीचे सर्वात मुख्य कारण आहे. नागपाडा येथील सिटी सेंटर मॉलला लागलेली आगही शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे इमारतींमधील अंतर्गत वायरींगवर लक्ष ठेवल्यास आगींवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवता येऊ शकते, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

नागरीकांनी राहात असलेल्या घराची इमारतीची आगीबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. असे प्रमुख अग्निशमन अधिकारी के. व्ही. हिरवाळे यांनी सांगितले.

eighty percent of fire breakouts are due to faulty wires says fire fighting authority

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: नववर्षाच्या जल्लोषासाठी मुंबई लोकल सज्ज! मध्यरात्री धावणार विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक

Year End 2025: भारत-पाकिस्तान हस्तांदोलन प्रकरण ते स्मृती मानधनाच्या आयुष्यात आलेलं वादळ; या वर्षातील ५ चर्चेत राहिलेल्या घटना

Latest Marathi News Live Update : 827 भारतीय लष्कराकडून इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया ॲप्लिकेशन्सच्या वापराबाबत धोरण जारी

Sangli Election : भाजप-शिवसेना सोबत येणार, पण खाडे–वनखंडे संघर्षामुळे मिरजचा तिढा कायम

Kolhapur Crime : लोंबकळणारा मृतदेह पाहून 'ती' घरी आली, नंतर लोकांनी सांगितलं 'तुझ्याच पोरानं घेतलाय गळफास...' आईला कळताचं...; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT