मुंबई

Ekanath Shinde: विधानसभा जिंकण्यासाठी मुख्यमंत्री लागले कामाला, शिवसैनिकांना दिला हा कार्यक्रम

Maharashtra Political News: कुटुंबाला तत्काळ लाभ मिळवून देण्यासाठी शिवसैनिक प्रशासकीय कागदपत्रांची पूर्तता करतील.

सकाळ वृत्तसेवा

Latest Shivsena news: ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या ऐतिहासिक यशानंतर आता शिवसेनेकडून ‘लाडकी भेट, कुटुंब भेट’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. शिवसैनिक राज्यात घरोघरी जाऊन या योजनांचा प्रचार करतील.

मुख्यमंत्री शिंदे हे स्वत: या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन काही निवडक कुटुंबांशी संवाद साधणार आहेत. प्रत्येक घरातील मुली आणि महिलांसह इतर सदस्यांना राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळतोय की नाही? तसेच ज्यांना लाभ मिळाला नसेल त्या कुटुंबाला तत्काळ लाभ मिळवून देण्यासाठी शिवसैनिक प्रशासकीय कागदपत्रांची पूर्तता करतील.

समस्या जाणून घेणार

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेपासून वंचित राहिलेल्या कुटुंबांच्या समस्या मुख्यमंत्री शिंदे स्वतः ऐकून घेणार आहेत. ‘‘ लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, शेतकऱ्यांसाठीच्या योजना, कामगार कल्याण योजना, महिला बचत गट अशा दहा आघाडीच्या योजना लोकांपर्यंत पोचल्या की नाही? याची माहिती राज्य सरकार घेणार आहे. ज्यांना या योजनांचा लाभ मिळाला नाही त्यांना तो कसा देता येईल? याकडे आम्ही लक्ष देणार आहोत,’’ असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

या योजनांचा प्रचार

लाडकी बहीण योजना

लाडकी लेक योजना

वयश्री योजना

युवा कार्य प्रशिक्षण योजना

मोफत अन्नपूर्णा योजना

शेतकऱ्यांची वीजबिल माफी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT