Eknath Shinde sakal
मुंबई

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

सकाळ ऑनलाइन ने दिली होती सर्वात पहिले बातमी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन प्रवेश

शर्मिला वाळुंज

Kalyan Loksabha : अंबरनाथमधील काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी विरोधी पक्षनेते प्रदीप पाटील यांनी रविवारी 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी प्रदीप पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉ. शिंदे यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया यावेळी प्रदीप पाटील यांनी दिली.

प्रदीप पाटील हे 1995 पासून अंबरनाथ नगरपालिकेचे नगरसेवक असून माजी विरोधी पक्षनेते सुद्धा राहिले आहेत. अंबरनाथ शहरात प्रदीप पाटील यांनी मागील अनेक वर्षे काँग्रेसची एकहाती धुरा सांभाळली.(kalyan loksabha news )

मात्र आता मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉ. शिंदे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीने प्रभावित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे प्रदीप पाटील यांनी सांगितले.(loksabha news)

प्रदीप पाटील यांच्यासह माजी नगरसेविका अर्चना रसाळ, चरण रसाळ, माजी नगरसेवक सुरेंद्र यादव, बबन तांबे, मनोज देवडे, बिस्मिल्ला शेख, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा स्मिता बंगेरा, नयना पवार, विद्या नागदिवे, अर्चना प्रसाद, मनीषा परमल, युथ काँग्रेसचे हर्षल भोईर, देवराज अल्झानडे, संकेत तांबे, आशिष डुबली ईशान जाधव, अश्फाक खान, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष नईम शेख यांच्यासह सुधीर जाधव, ज्ञानेश्वर शेलार, अनिल कांबळे, प्रशांत उतेकर हे प्रमुख पदाधिकारी तसेच शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉ. शिंदे यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. आगामी काळात पूर्ण ताकदीने शिवसेनेचे काम करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी प्रदीप पाटील यांनी दिली.(ambarnath political )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tobacco Excise Duty: सिगारेट आणि पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! नवा कर लागू होणार; पण कधीपासून? तारीख आली समोर

T20 World Cup 2026 साठी कांगारुंचा मास्टर प्लॅन! स्पर्धासाठी १५ जणांचा संघ जाहीर; कमिन्सचे पुनरागमन, पण कर्णधार कोण?

Maharashtra SSC Exam Schedule 2026: तयारीला लागा! SSC बोर्ड परीक्षा 2026 वेळापत्रक जाहीर, पाहा पहिला कोणता पेपर

धक्कादायक! आईशी भांडून घरातून निघालेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन तास गाडीत किंचाळत होती, पण कोणीच...

Thane Fire News: नववर्षाची सुरुवात आगीच्या घटनांनी; परिसरात धुराचे मोठे लोट; नागरिकांमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT