Elphinstone bridge affected people will get MHADA house

 

ESakal

मुंबई

Mhada House: एलफिस्टन बाधितांना मिळणार म्हाडाचे घर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

Elphinstone Bridge: एल्फिन्स्टन पुलाचे बांधकाम सुरु करण्यात येणार असून आज रात्री या पुलावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. तसेच या परिसरातील बाधित रहिवाशांचे पुनर्वसन म्हाडाच्या सदनिकांमध्ये केले जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवडी-वरळी उन्नत मार्गामधील एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील बाधित दोन इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन त्याच परिसरातील म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये केले जाणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (ता. ११) मान्यता दिली.

एल्फिन्स्टन पुलाच्या जागेवर एमएमआरडीएकडून डबल डेकर पूल उभारला जाणार आहे. त्यामुळे लक्ष्मी निवास व हाजी नुरानी चाळ या दोन इमारती बाधित होणार असून, तेथील एकूण ८३ प्रकल्पग्रस्त रहिवाशांचे पुनर्वसन आता त्याच परिसरात होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रस्ताव मान्य केल्यामुळे येथील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

वरळी-शिवडी कनेक्टर उभारणीसाठी एलफिन्स्टन पूल पाडण्यात येणार असून, पिलर उभारणी करताना लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानी चाळ या दोन इमारती बाधित होणार आहेत. या दोन इमारतींमधील रहिवाशांची त्याच परिसरात म्हाडाकडे उपलब्ध असलेल्या सदनिकांमध्ये पुनर्वसनाची मागणी केली जात होती. लक्ष्मी निवास इमारतीमधील ६० प्रकल्पग्रस्त आणि हाजी नुरानी चाळमधील २३ प्रकल्पग्रस्त अशा एकूण ८३ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आता त्याच परिसरात होणार आहे.

रचनात्मक बदलामुळे ५,२०० कोटी बचत

शिवडी-वरळी उन्नत प्रकल्पात एकूण १९ इमारती बाधित होणार होत्या; पण ‘एमएमआरडीए’ने रचनात्मक बदल करून १७ इमारती प्रकल्पाच्या मार्गामुळे बाधित होणार नाही, याची काळजी घेतली आणि मार्ग बदलला, ज्यामुळे केवळ रहिवाशांचे पुनर्वसन सुलभ झाले नाही तर पुनर्वसनावर होणारा ५,२०० कोटी रुपयांचा खर्च वाचविला. तसेच, या निर्णयामुळे प्रकल्पाची गती वाढून तो निर्धारित वेळेत पूर्ण होऊ शकेल. आता एल्फिन्स्टन बाधितांचाही प्रश्न निकाली निघाल्याने या प्रकल्पाला गती मिळेल.

पुनर्वसनाचे निकष

  • ३०० चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या घरमालकांना ३०० चौरस फूट अधिक ३५ टक्के अतिरिक्त, असे एकूण ४०५ चौरस फुटांची सदनिका देण्यात येणार

  • ३०० ते १२९२ चौरस फूट क्षेत्रामधील घरमालकांना विद्यमान क्षेत्र अधिक ३५ टक्के अतिरिक्त क्षेत्रफळाप्रमाणे नवे घर दिले जाणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

सायबर फ्रॉडपासून बचावासाठी ‘ही’ पंचसूत्री लक्षात ठेवाच! अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, नाहीतर रिकामे होईल बॅंक खाते; सोलापूर शहर सायबर पोलिस म्हणतात...

Uddhav Thackeray Statement : ''मुंबईत अ‍ॅनाकोंडा येऊन गेला अन् भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची'' ; उद्धव ठाकरेंचं विधान!

Swargate News : एसटीला ‘लाडकी बहिणच’ नकोशी! बससेवेत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर भेदभाव

SCROLL FOR NEXT