Eknath Shinde: मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर, वर्सोवा पुल दुर्घटनेची केली पाहणी मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर, वर्सोवा पुल दुर्घटनेची केली पाहणी
मुंबई

Eknath Shinde: मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर, वर्सोवा पुल दुर्घटनेची केली पाहणी

Accident News: aबांधकामाच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत जेसिबी ऑपरेटर राकेश यादव हे जेसीबीसह ढीगाऱ्याखाली आडकले

सकाळ वृत्तसेवा

Palghar News: सूर्याप्रकल्पाचे पाणी मीरा भाईंदरच्या दिशेने नेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एम.एम.आर.डी.ए.) मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या वर्सोवा पुलाखालील बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दुर्घटनाग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कुटुंबीयांना एल. अँड टी. कंपनीमार्फत पन्नास लाख रुपयांची मदत तसेच कुटुंबातील एका व्यक्तीला एल. अँड टी. कंपनीमध्ये नोकरी देण्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

यावेळी घटनास्थळी पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एम.एम.आर.डी.ए.) चे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार, मिरा भाईंदरचे पोलिस आयुक्त मधुकर पांडे, मिरा भाईंदरचे अतिरिक्त पोलिस आयुक्त श्रीकांत पाठक, जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

सूर्याप्रकल्पाचे पाणी मीरा भाईंदरच्या दिशेने नेण्यासाठी एम.एम.आर.डी.ए. मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या वर्सोवा पुलाखालील बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत जेसिबी ऑपरेटर राकेश यादव हे जेसीबीसह ढीगाऱ्याखाली आडकले असून, त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

घटनास्थळी भारतीय नौसेना (Navy), भारतीय लष्कर (Army), राष्ट्रिय आपत्ती प्रतिसाद दल - NDRF, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल- TDRF, अग्निशमन दलाच्या तुकड्यांना बोलवण्यात आले आहे. दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी व्हीजेटीआयच्या तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शनही घेण्यात येत आहे.

घटनास्थळाची पाहणी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले , भारतीय नौदल व भारतीय लष्करातील जवानांना बाचाव कार्याचा अनुभव असतो त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून या दुर्घटनेतील व्यक्तीला बाहेर काढण्यास यश मिळेल. दुर्घटनाग्रस्त व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू झाला.

त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना एल. अँड टी. कंपनी मार्फत पन्नास लाख रुपयांची मदत आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला एल अँड टी. कंपनीत नोकरी मिळणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगीतले.

यावेळी राकेश यादव यांच्या पत्नी, दोन मुली, एक मुलगा आणि वडील व इतर सदस्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हधिकारी श्री.बोडके यांना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : ''परधर्मातील मुलासोबत पळून जाणाऱ्या मुलींचे हातपाय तोडा'', भाजपच्या माजी खासदाराचं वादग्रस्त विधान!

IND vs AUS 1st ODI Live: टीम इंडियाला अक्षर पटेल, लोकेश राहुलने दिला आधार; २६ षटकांच्या सामन्यांत ऑसींसमोर 'इतके' लक्ष्य

Crime: लग्नाच्या ११ दिवसांनी १६ वर्षीय मुलीने बाळाला जन्म दिला, नंतर १९ व्या दिवशी पतीला अटक अन्...; घटना वाचून डोकं चक्रावेल

Nashik News : दत्त मंदिराची त्वरित पुनर्स्थापना करा; हिंदू एकता आंदोलन आणि काँग्रेस पक्षाचा प्रशासनाला इशारा

Latest Marathi News Live Update : जळगावात रिक्षाचा अपघात, चंद्रकांत पाटलांकडून मदत

SCROLL FOR NEXT