Eknath Shinde
Eknath Shinde Sakal
मुंबई

Dasara Melava : एकनाथ शिंदेंना शिवाजी पार्क मिळायला हवं होतं - रामदास आठवले

सकाळ डिजिटल टीम

दसरा मेळाव्याचा दीर्घकाळपासून रंगलेला वाद अखेर हायकोर्टाच्या निर्णयामुळे शांत झाला. हायकोर्टाने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क उद्धव ठाकरेंच्या पदरात टाकलं. त्यामुळे ठाकरे गटात आनंद तर शिंदे गटात नाराजीचं वातावरण आहे. अशातच आता शिवाजी पार्क एकनाथ शिंदेंना मिळायला हवं होतं, असं म्हणत रामदास आठवले यांनी शिंदेंची बाजू घेतली आहे.

पुण्यात माध्यमांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क हे मैदान एकनाथ शिंदे यांना मिळायला हवं होतं. उद्धव ठाकरेंना दुसरं मैदान द्यायला पाहिजे. हायकोर्टाने जो निर्णय दिला तो आता मान्य करायलाच पाहिजे. खरंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघांचेही मेळावे व्हायला हवेत.

मी आधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मानत होतो. पण आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मानतो, असंही आठवले म्हणाले आहेत. मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे आता दसरा मेळाव्याच्या वादावर पडदा पडल्याचं दिसत आहे. तरी शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचीही तयारी दाखवली आहे. शिवाय शिंदे गटाला बीकेसीतल्या एमएमआरडीए मैदानाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे तिथे शक्तिप्रदर्शन करत शिंदे गट दसरा मेळावा भरवण्याचीही शक्यता आहे. मात्र अद्याप याविषयी कोणतीही स्पष्ट माहिती हाती आलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT