मुंबई

उद्धव ठाकरेंसाठीची 'ती' गोड बातमी अखेर आली....

सकाळवृत्तसेवा

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागतोय की काय अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकीय परिघात चर्चा होती. ऐन कोरोनाच्या संवेदनशील परिस्थितीत महाराष्ट्रात राजकीय गरमगरमी पाहायला मिळाली. मात्र आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी चांगली बातमी समोर येतेय. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज सकाळी हा निर्णय घेण्यात आलाय. 

महाराष्ट्रात घटनात्मक पेच निर्माण होऊ नये म्हणून महाविकास आघाडीकडून २ वेळेस राज्यपालांना मुख्यमंत्र्यांना राज्यपाल कोट्यातून आमदार करण्याची मागणी करण्यात आली. यानंतर मुंबई उच्च न्यायालयात याचिका देखील करण्यात आली. महाविकास आघाडीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे लवकर विधान परिषदेची निवडणूक घेण्याची मागणी केलेली, स्वतः राज्यपाल कोश्यारी यांनी देखील तशा प्रकारची मागणी केल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना  दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतेय. त्यामुळे ठाकरे यांना 28 मे च्या आत आमदार होणे शक्य होणार आहे. 

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार निवडणूक घेण्यास अनुमती जरी दिली असली तरीही निवडणुकीसाठी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळावे लागणार आहेत.   

election commission grants permission to conduct Legislative Council MLCs in Maharashtra

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT