मुंबई

पालघर प्रकरणातील २३ आरोपींना ठेवण्यात आलेलं वाडा पोलिस ठाणेच बंद करायची आली वेळ, कारण...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : पालघरमधील गडचिंचचे गावातील साधू मारहाण आणि हत्या प्रकरण अजूनही ताजं आहे. अशातच या प्रकारांतील २३ आरोपीना वाडा पोलिस ठाण्यात ठेवण्यात आलं होतं. यापैकी १७ आरोपींची स्वॅब तपासणी केली गेली. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी ११ आरोपी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर यांच्यातील सहा जणांचे कोरोना रिपोर्ट अजून आलेले नाहीत.

पालघर साधू मारहाण आणि हत्या प्रकरणातील एका आरोपीची कोरोना चाचणी २ मे रोजीच पॉझिटिव्ह आली होती. हा आरोपी वाडा भागात आढळून आलेला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होता. यानंतर आता तब्बल जणांची टेस्ट करण्यात अली आहे. त्यापैकी ११ जण पॉझिटिव्ह तर उर्वरित सहा जणांचे कोरोना रिपोर्ट येणं अद्याप बाकी आहे .

दरम्यान आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची खबरदारी म्हणून वाडा पोलिस ठाणे दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या पोलिस स्टेशनला लागूनच एक तहसील कार्यालय आहे. हे कार्यालय  देखील आता पुढील २ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान एकत्र ११ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झाल्यानंतर आता या परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. पालघर साधू मारहाण आणि हत्या प्रकरणात पोलिसांकडून शंभरहून अधिकांना आरोपी म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळाली होती. 

eleven accused in palghar sadhu lynching case are covid positive vada police station shut for 2 days

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT