पालकांनो..! कोरोनामुळे गोंधळ आणखी वाढण्याची शक्‍यता  
मुंबई

पालकांनो..! कोरोनामुळे गोंधळ आणखी वाढण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाचा फटका यंदा बहुतांश परीक्षांना बसला आहे. आगामी सर्व शैक्षणिक सत्रांवर याचा परिणाम होणार आहे. दरवर्षी उन्हाळ्यात अकरावी प्रवेश प्रक्रियेची तयारी सुरू होते. यंदा दहावीचीच परीक्षा अर्धवट, शाळा बंद, यामुळे अकरावी प्रवेशाचे नियोजन कोलमडण्याची शक्‍यता आहे. 

दहावी निकालानंतर मनासारख्या महाविद्यालयात आपल्या पाल्याला प्रवेश मिळेल का, याची चिंता पालकांना असते. यंदा कोरोनामुळे दहावीचा एक पेपर अद्याप शिल्लक आहे. परीक्षा होणार की नाही यासंदर्भात राज्य मंडळाने अजून निर्णय जाहीर केलेला नाही. दरवर्षी एप्रिल महिन्यात अकरावीच्या प्रवेशाच्या प्रक्रियेला सुरुवात होते. नवीन महाविद्यालय, त्यांची जागा, नोंदणी अशी कामे या काळात केली जातात. यंदा मात्र ही कामे सुरू होणार की नाही याबाबत संभ्रम आहे. दरवर्षी सप्टेंबरपर्यंत अकरावीचे प्रवेश पूर्ण करावे लागतात. साधारणत: एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष अर्जाचा पहिला टप्पा भरण्यास सुरुवात होते. यंदा ही प्रक्रिया पुढे ढकलली जाईल आणि त्याचा थेट परिणाम प्रवेशावर होण्याची शक्‍यता आहे. 

दरम्यान, अकरावी प्रवेश प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी नोयडाच्या "नायसा'या कंपनीकडे गेल्या तीन वर्षांपासून आहे. मागील वर्ष या कंपनीचे शेवटचे वर्ष होते. यंदा नव्याने निविदा काढून नवी कंपनी सरकारकडून नेमण्यात येणार होती. गेल्या तीन वर्षांत नायसाबाबत अनेक तांत्रिक तक्रारी होत्या, त्यामुळे प्रवेशात अनेकदा गोंधळही उडाला होता. अशात नवीन कंपनी निवडण्यासाठी आणखी विलंब झाल्यास त्याचा फटका प्रवेश प्रक्रियेला बसणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: पुणे मेट्रोचा मोठा निर्णय! बंद असलेले गेट्स आता पूर्वीसारखे उघडणार नाहीत; मंगळवारी वेळेत बदल

Police Action: धूलिवंदनला कायद्याचा कडक पहारा! उल्हासनगर पोलिस सतर्क; समाजकंटकांवर राहणार करडी नजर

Latest Marathi News Live Update: इ-चलन विरोधात वाहतूक संघटनांचा एल्गार, मंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ

जगावर घोंगावतंय महायुद्धाचं संकट! Baba Vanga यांनी दशकांपूर्वीच केली होती भीषण युद्धाची भविष्यवाणी; सध्याच्या घटनांशी जुळतंय का भाकीत?

IND vs ENG: २ पराभव अन्... ! भारताचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध रेकॉर्ड कसा आहे? जाणून घ्या आकडे कोणाच्या बाजूने

SCROLL FOR NEXT