heavy traffick heavy traffick
मुंबई

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तांचा महत्त्वाचा निर्णय

मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी वाहन चालकांना दिलासा दिला आहे.

वैदेही काणेकर

मुंबई: मुंबईचे पोलीस आयुक्त (mumbai police commissioner) हेमंत नगराळे यांनी वाहन चालकांना दिलासा दिला आहे. त्यांनी वाहतूक पोलिसांना (traffic police) वाहनांना थांबवून त्यांची तपासणी तसेच कागदपत्रांची तपासणी (document check) न करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईच्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी (traffic congestion) टाळण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांनी हे आदेश काढले आहेत.

मुंबईत बहुतांश ठिकाणी गाड्या थांबवून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. जी वाहन ट्राफिक नियमांचे उल्लंघन करतील अशाच वाहनांना थांबण्यास प्राधान्यक्रम देण्याचे आदेश हेमंत नगराळे यांनी मुंबई ट्रॅफिक पोलिसांना दिले आहेत.

तसेच कागदपत्रांची तपासणी वाहतूक विभागाने करण्याऐवजी वाहतूक कशी सुरळीत राहील याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज असल्याचं हेमंत नगराळे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने इतिहास घडवला! सर्वोच्च धावसंख्या, भारताविरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड; कॅम्बेल, होप अन् जांगूचे शतक, ४०० पार

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील 'मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड'मध्ये अचानक भीषण आग

कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकरला पाहून येईल चीड; राजकुमार रावही जबरदस्त, 'प्रहार' चा ट्रेलर बनला चर्चेचा विषय

SCROLL FOR NEXT