high court sakal media
मुंबई

एल्गार परिषद प्रकरणात NIA ने आरोप निश्चिती केल्यानंतर खटल्याची कारवाई- HC

सुनिता महामुनकर

मुंबई : एल्गार परिषद (elgar parishad) प्रकरणात एनआयए (NIA) ता. 25 नंतरच आरोपींवर (accused) आरोप निश्चितीची कारवाई करणार आहे, असे आज एनआयएच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai high court) स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे खटल्याची (case) कारवाई त्यानंतर सुरू होऊ शकते.

विशेष न्यायालयात ता 23 रोजी तपास यंत्रणा आरोप निश्चित करणार होती. मात्र काही आरोपींनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. एन आय एने अद्याप आरोपांचा मसुदा दिलेला नाही, असे याचिकेत सांगण्यात आले आहे. उच्च न्यायालयात आज यावर सुनावणी झाली. आरोपी सुधा भारद्वाज आणि अन्य काही आरोपींनी याचिका केली आहे असे एड युग चौधरी यांनी आरोपींच्या वतीने सांगितले. तसेच अन्य काही अर्जावर विशेष न्यायालयात सुनावणी व्हायची आहे, असेही त्यांनी सांगितले.

याचिकेवर बुधवारनंतर ( ता. 25) सुनावणी घ्यावी, तोपर्यंत आरोपींना संबंधित कागदपत्रे देण्यात येतील, अशी विनंती एन आय एच्यावतीने एड संदेश पाटील यांनी केली. तपास अधिकार्यांनी पंधरा आरोपींविरोधात वीस आरोपांचा मसुदा विशेष न्यायालयात दाखल केला आहे. यामध्ये भादंवि आणि यूएपीए कायद्याचा समावेश आहे. आरोप निश्चित झाले कि आरोपींची बाजू ऐकून न्यायालय खटल्याची कारवाया सुरू करु शकते. भीमा कोरेगाव हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणात मागील तीन वर्षाहून अधिक काळ आरोपी अटकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : 'आप' नेते सत्येंद्र जैन आणि इतर ४ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT