रिंगरुटबाधित नागरिकांनी प्रजासत्ताकदिनी काढला पालिकेवर मोर्चा.  
मुंबई

कल्याणमधील रिंगरुटबाधितांचा एल्गार 

सकाळ वृत्तसेवा

कल्याण : शिळफाटा- डोंबिवली- कल्याण व्हाया टिटवाळा यादरम्यान रिंगरुट रस्त्याचे काम एमएमआरडीए आणि कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्या माध्यमातून होणार आहे. यात रस्त्यातील अटाळी आणि आंबिवली परिसरामधील बाधित नागरिकांनी रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) नेतृत्वाखाली रविवारी (ता. 26) प्रजासत्ताकदिनी सकाळी 7 च्या सुमारास पालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केला. प्रजासत्ताकदिनीच मोर्चा काढल्याने सुरक्षा यंत्रणांचे चांगलेच धाबे दणाणले होते. 

आंबिवली, अटाळी परिसरामधील एकूण 945 कुटुंबीय या रिंगरूट प्रकल्पामध्ये बाधित होणार आहेत. रिंगरुट प्रकल्पात अडथळा ठरणारी घरे, दुकाने, इमारती हटवण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेमार्फत नागरिकांना नोटिसा देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आंबिवली आणि अटाळी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून कुठलेही पुनर्वसनाचे धोरण जाहीर न करता नोटीस आणि अन्य कारवाई सुरू केल्याच्या निषेधार्थ रविवारी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय महासचिव दयाल बहादुरे, जालिंदर बर्वे, संदीप घाडगे, सुवर्णा पाटील आदींसमवेत बाधित नागरिकांनी पालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढला. 

प्रजासत्ताकदिनाचा कार्यक्रम असल्याने पालिका मुख्यालय प्रवेशद्वारावर मोर्चा अडवण्यात आला. त्याच वेळी मोर्चेकरी घोषणाबाजी करू लागले. अखेर नागरिकांना आत सोडण्यात आले. मात्र त्यांच्या मागणीचा फलक सुरक्षा रक्षकांनी काढून घेतला. प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमानंतर नागरिकांनी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेऊन निवेदन देत समस्य मांडल्या. आयुक्तांनी लवकरात लवकर विषय मार्गी लावू, असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heavy Rain : पुणेकर त्रस्त; यंत्रणा मात्र सुस्त, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला उशिरा जाग

LPG import updates: 'एलपीजी'बाबत सरकारने प्लॅन बदलला! अमेरिकेसोबत मोठा निर्णय, गॅसचं संकट टळणार

Pune Heavy Rain : पावसाने दाणादाण! जनजीवन विस्कळित, घरांसह दुकानांमध्ये शिरले पाणी

Davadi News : रेटवडी येथील तरुण ओढ्यात दुचाकीसह वाहून बेपत्ता

विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाचा निधी संपला! विद्यापीठ शासनाला पाठविणार सुधारित अंदाजपत्रक; पुतळ्याचे तोंड उत्तरेकडे नको, पूर्वकडे करण्याची नवी मागणी

SCROLL FOR NEXT