मुंबई ः सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात शुक्रवारी आझाद मैदानात आंदोलन करण्यात आले.(प्रशांत चव्हाण ः सकाळ छायाचित्र सेवा) 
मुंबई

कागज नही दिखाऐंगे...!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘हम कागज नही दिखाएंगे, हम कागज नही दिखाएंगे...’ या कवितेतील ओळींचा जयघोषांनी शुक्रवारी आझाद मैदान दुमदुमले. निमित्त होते सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि राष्ट्रीय जनगणना अभियाना विरोधात जॉईंट अॅक्शन कमिटी फॉर सोशल जस्टीस महाराष्ट्रने आयोजित केलेल्या इन्कलाब मोर्चाचे.. यावेळी ‘जेएनयू’चा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद, अभिनेत्री स्वरा भास्कर, माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटील यांच्यासह विद्यार्थी, दलित आणि मुस्लिम संघटना मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.

‘जेएनयू’चा बोलताना उमर खालिद म्हणाला की,  देशातील लोकांचे संविधानावर किती प्रेम आहे हे आम्ही आंदोलनातून दाखवून दिले आहे. मात्र, त्याची दखल घ्यायला सरकार तयार नाही. लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. धर्माच्या नावावर आपआपसात लढवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. आम्ही मात्र भारतीय बनून त्याचा विरोध करणार. उत्तर प्रदेशात सरकारची गुंडगिरी सुरू आहे. तिथे विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरु असल्याचा आरोपही त्यांने केला. गृहमंत्री अमित शहा संसदेत ९ वेळा सीएए, एनपीआर, एनआरसी आणणार असल्याचे सांगतात आणि पंतप्रधान असे काहीही नसल्याचे सांगतात. त्यामुळे खरे-खोटे काय हे देशाला कळाला पाहिजे, अशी मागणी त्याने केली.

माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे-पाटील यांनीही यावेळी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली. मोदी-शहा हे ‘आरएसएस’चे दलाल आहेत. त्यांची विचारधारा लोकांवर लादून घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, लोकांनी घाबरण्याचे कारण नाही.

सीएसएमटी परिसराला पोलिस छावणीचे रूप
आझाद मैदानातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन सीएसएमटी रेल्वेस्थानक, महापालिकेजवळ कडेकोट बंदोबस्त होता. मुंबई पोलिसांसह राखीव पोलिस दल, दंगल नियंत्रण पथकही तैनात ठेवण्यात आले होते.

आंदोलकांवर ड्रोन कॅमेऱ्याचा वॉच
आझाद मैदानात मोठ्या प्रमाणावर आंदोलकांनी गर्दी केली होती. अशावेळी कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी ड्रोन कॅमेराची व्यवस्था केली होती. आंदोलन सुरू असतांना पोलिसांचा हा ड्रोन कॅमेरा आझाद मैदानात घिरट्या घालत होता.

सरकार लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी नवनवीन डाव खेळत आहे. त्यांनी आता सीएए आणि एनआरसी सारखी नवी जनावरे लोकांवर सोडली आहेत. भाजप सरकारने लादलेल्या या कायद्याचा त्रास केवळ मुस्लिमांना नाही तर सर्वांनाच होणार आहे. 
- स्वरा भास्कर
, अभिनेत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohagad Murder Case: ''प्रतिष्ठेसाठी सियाने केतनला ठार मारण्याचा प्लॅन केला'', पोलिस चौकशीत चेतनचा धक्कादायक दावा

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: राष्ट्रीय राजधानीच्या अनेक भागांत जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT