मुंबई विमानतळावर जायचंय; मग हे करावंचं लागणार! 
मुंबई

मुंबई विमानतळावर जाताय; मग "हे" करावंचं लागणार!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोव्हिड-19 विषाणूच्या फैलावामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणे बंद आहेत. लॉकडाऊन उठल्यानंतरच हवाई सेवा पुन्हा सुरू होणार असून, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना राबवणार असल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले.

विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना सूचनांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. प्रवाशांना एकमेकांपासून किमा दीड मीटर अंतर ठेवावे लागेल. गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन चेक-इन करणे अनिवार्य आहे. प्रवाशांनी कमीत कमी सामान बाळगावे लागणार असून, थर्मल स्क्रीनिंग केले जाईल. विमानतळाची नियमित स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. 

विमानतळावर सुरक्षिततेसाठी प्रशासनाने प्रत्येक टर्मिनलवर विशिष्ट चिन्हांकन केले आहे. त्यानुसार प्रवेशद्वार, चेक-इन काऊंटर, सेल्फ-चेक-इन , सुरक्षा चौक्‍या, फूड कोर्ट, लाऊंज एरिया आणि बोर्डिंग एरिया; तसेच टर्मिनल इमारतीतील आसन व्यवस्था सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या दृष्टीने बदलण्यात येणार आहे. विमानतळ कर्मचाऱ्यांसाठी सेल्फ चेक-इन, बोर्डिंग आणि इतर सर्व ठिकाणी हॅंड सॅनिटायझर ठेवले जातील. प्रवाशांनी विमानात मास्क आणि हातमोजे वापरण्यावर विशेष भर दिला जाईल, असे सांगण्यात आले. विमानतळावरील उपाहारगृहे आणि दुकानांत कॉंटॅक्‍टलेस पेमेंटचा वापर केला जाणार आहे. 

पुन्हा काम सुरू करताना... 
सुरुवातीच्या टप्प्यात सरकारच्या निर्देशांनुसार विमानतळावरील कर्मचाऱ्यांची संख्या 50 टक्के राहील. स्वच्छता व निर्जंतुकीकरणावर विशेष भर दिला जाईल. लिफ्टची बटणे, एस्कलेटर, इमिग्रेशन काऊंटर आदी महत्त्वाच्या भागांची स्वच्छता व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षेला प्राथमिकता दिली जाईल, असे जीव्हीके एमआयएएल अधिकाऱ्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी भारतात आला होता कसाब? उज्ज्वल निकमांचा धक्कादायक दावा, म्हणाले...

Pune DJ Noise : पुण्यात डीजेपुढे पोलिस हतबल!, पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट अन् दादागिरीची भाषा; ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’

विद्यार्थिनीवर कथित अत्याचाराचा मेसेज व्हायरल; विद्यार्थ्यांनी विद्यापीठात केली तोडफोड, राष्ट्रीय महामार्गही रोखून धरला

IND vs WI, 1st ODI Weather : पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा येणार? तिरुअनंतपुरममध्ये कसे आहेत हवामान अंदाज, घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरे दुष्काळ दौरा भेटीसाठी परभणी दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT