नवी मुंबईतील 'या' गावांना मिळणार स्वतःची ओळख! 
मुंबई

नवी मुंबईतील 'या' गावांना मिळणार स्वतःची ओळख!

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : महापालिकेतर्फे कोपरखैरणे विभागातील सहा गावांच्या वेशीवर प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहेत. विकासाच्या ओघात नवी मुंबईतील गावांची ओळख टिकून राहावी, म्हणून प्रवेशद्वार उभारण्याच्या मागणीला स्थानिकांसह लोकप्रतिनिधींकडून आग्रह केला जात होता. त्यामुळे कोपरखैरणेतील कोपरखैरणे गाव, बोनकोडे, खैरणे, अडवली-भुतवली, महापे आणि पावणे या सहा गावांसमोर प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहेत. 

ही बातमी वाचली का? हायप्रोफाइल वेश्याव्यवसायावर पोलिसांनी घेतला हा निर्णय..

1992 ला 30 गावांचा समावेश करून नवी मुंबई महापालिकेची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत अनेक वर्षे लोटल्यानंतर नवी मुंबई शहराचा कायापालट झाला आहे. गावांच्या जमिनींवर उंच उंच इमारती, आलिशान मॉल्स, वाणिज्य आणि व्यावसायिक संकुलांपासून शहरे विकसित झाली आहेत; परंतु ज्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींवर ही शहरे उभी राहिली, त्यांच्या गावांची ओळख हळूहळू शहरातून गायब होत चालली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील गावांची ओळख टिकून राहावी. याकरीता सर्व गावांच्या वेशीवर टप्प्याटप्प्याने प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहेत. तसा प्रस्ताव अभियांत्रिकी विभागामार्फत सादर करण्यात आला. शुक्रवारी (ता.27) पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता काही दिवसांत प्रत्यक्ष प्रवेशद्वार उभारण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. 

ही बातमी वाचली का? मुंबईकरांनो मटन खाताय! जरा थांबा कारण..
 
जवळपास 85 लाखांचा खर्च 
महापालिकेच्या पॅनेलवरील वास्तुविशारद सोपान प्रभू यांनी प्रवेशद्वाराच्या रचना तयार केल्या आहेत. प्रवेशद्वार उभारण्यासाठी कंत्राटदाराला 8 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. सहा गावांजवळ प्रवेशद्वार उभारण्यासाठी पालिकेतर्फे तब्बल 84 लाख 92 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरला यलो अलर्ट

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT