Aarey land carshed sakal media
मुंबई

मुंबई : आरे कारशेड हस्तांतरणाचं काय झालं ? पर्यावरणप्रेमींमध्ये संभ्रम

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आरे मेट्रो कारशेड (Aarey Metro carshed) कांजूरमार्गला स्थलांतरित करण्याचा निर्णय होऊन तीन वर्षे उलटली तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यावर आरे कन्झर्व्हेशन ग्रुपने (Aarey conservation group) बैठक घेऊन पुढील रणनीती ठरवली असून आठवडाभरात एमएमआरडीएच्या आयुक्तांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारने (Maharashtra Government) आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला (Kanjurmarg) हलवण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. कोणताच निर्णय न झाल्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संभ्रम आहे.

त्याविरोधात पर्यावरणप्रेमी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी आज एकत्र येत पुढील रणनीतीवर चर्चा केली. आरेतील मेट्रो कारशेड स्थलांतर आणि सुरू असलेल्या बांधकामाबाबतही संभ्रम आहे. त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहनही आरे कन्झर्व्हेशन ग्रुपने केले आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून वारंवार केंद्र सरकारकडे बोट दाखवले जाते. केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर कारशेडचे स्थलांतरण केले जाईल, असे त्यांच्याकडून सांगितले जाते. त्याबाबतही पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे येत्या आठवडाभरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अध्यक्षांची भेट घेऊन चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तीव्र आंदोलनाचा इशारा

राज्य सरकारने आरे कारशेड रद्द करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे. मेट्रो कारशेड आरे कॉलनी हद्दीच्या बाहेर नेण्याची कार्यवाही सुरू करावी. काही राजकीय नेते केवळ समाजमाध्यमांवर आरेप्रकरणी आपला कळवळा व्यक्त करतात. प्रत्यक्षात मात्र ते आरेविषयी गंभीर नसल्याचे दिसते. त्यामुळे सरकारने त्यावर लवकरात लवकर हालचाल करावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आरे कन्झर्व्हेशन ग्रुपचे सदस्य स्टॅलिन डी. यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attack : अभिषेक बॅनर्जींवर जीवघेणा हल्ला; विटा-दगडं फेकत डोळे आणि छातीवर वार, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाल्या, सत्ताधारी खुनी...

Pune News: हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद? पगार नाही, चेक बाऊन्स... ७०० इंटर्न आणि कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा उघड

Hero New Bike : पेट्रोल पंपावर जायचं विसरा! लॉन्च झाली Hero ची दमदार बाइक; 72km मायलेजसह जबरदस्त स्मार्ट फीचर्स, किंमत फक्त...

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

Akola RSS Office Attack Case: आरएसएस कार्यालय हल्ला प्रकरणात आमदार साजिद खान पठाण यांच्यासह १२ जणांची १६ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT