मुंबई

संसर्ग सुरुच तरी आपण आता सावरायला हवं! चित्रपटगृहे सुरू करण्याबाबत विचार सुरू

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः कोरोनाच्या आक्रमणानंतर सावरण्यास जगात सुरुवात झाली. अमेरिका, युरोप तसेच अनेक देशात थिएटर सुरु झाले आहेत, भारतातही त्या दृष्टीने विचार सुरु झाला आहे. दर्शकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्यासाठी तिकिटांचा दर सुरुवातीस कमी ठेवण्याचा विचार होत आहे. हे गणित जुळण्यासाठी सुपरहिट चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याबाबत विचार सुरु असल्याचे समजते.

चित्रपट वितरक तसेच निर्मात्यांची सरकारबरोबर चर्चा सुरु आहे. त्यात विविध उपायाबाबत चर्चा सुरु आहे, पण त्याचवेळी दर्शकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्याचे आव्हान जास्त असेल. अनेक निर्माते सुरुवातीस आपला नवा चित्रपट वितरीत करण्यास तयार नसतील.  त्या परिस्थितीत जुनेच चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार होत आहे. त्याबाबत सुपरहिट दिग्दर्शक किंवा सुपरहिट कलाकारांचे चित्रपट लागोपाठ प्रदर्शित करण्याबाबतही विचार सुरु आहे. 

तिकिटांचे दर कमी करण्याबद्दलच प्रसंगी मोफत चित्रपट दाखवण्याबाबतही विचार होत असल्याचे समजते. मात्र त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्याबाबत चर्चा सुरु आहेत, विविध पर्यायांचा विचार सुरु आहे. त्यानुसार थिएटर सकाळी दहा वाजता सुरु करुन संध्याकाळी सहा वाजता बंद करण्याचा पर्यायही दिला असल्याचे समजते. जुलैत हॉलीवूडचे नवे चित्रपट जगभरात प्रदर्शित होत आहेत. त्याच्या जोडीला हिंदीतील जुने सुपरहिट चित्रपट रिलीज करुन सुरुवात करता येईल, असाही पर्याय समोर येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT