मिरची 
मुंबई

जव्हारच्या मिरचीचा तडका एपीएमसीत

सकाळ वृत्तसेवा

तुर्भे : जव्हार तालुक्‍यातील पिंपळशेत खरोंडा आणि तेथील 12 गाव, पाड्यांतील एक्‍स्पोर्ट क्वॉलिटीची शेकडो टन मिरची वाशी मार्केटमध्ये दाखल झाली आहे. 

पालघर जिल्ह्यात रूरल कॉम्युनिस या संस्थेने पिंपळशेत खरोंडा आणि परिसरातील 12 शेतकऱ्यांना विविध प्रकारची दर्जेदार एक्‍स्पोर्ट क्वालिटी मिरची लागवड करून दिली आहे. याशिवाय, त्यांना खत, कीटकनाशके, बी-बियाणे पुरवठा करून तांत्रिक देखभाल केली. त्यानंतर तयार झालेली शेकडो टन मिरची संस्थेच्या माध्यमातून परदेशात पाठवण्यात आली आहे. कृषी विभागाची यात महत्त्वाची भूमिका असून, कृषी विभागाने या शेतकऱ्यांना इम्पोर्ट एक्‍स्पोर्ट नोंदणी करून दिली. 

लॉकडाऊनमुळे अडकलेला माल 24 मार्चपासून पडून होता. ही बाब तालुका कृषी अधिकारी गावित यांनी स्थानिक प्रशासन अधिकारी तहसीलदार संतोष शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी वाडा व जिल्हा कृषी अधिकारी यांच्या निदर्शनास आणली. त्यामुळे हा माल वाशी बाजारात नेण्यास परवानगी मिळाली. 15 टन माल वाशी बाजारात पोहचला आहे. 

परदेशात पाठवण्याची तयारी 
सरकारने नुकतीच तात्पुरती परदेशी निर्यात सेवा सुरू केली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या मिरची मालाचा दुसरा तोडा थेट परदेशात निर्यात करण्याबाबत कृषी विभागाकडून हालचाली सुरू आहेत. पहिला 5 टन माल लॅबमार्फत तपासणी करून अहवाल प्राप्त झाल्यानंतर परदेशात निर्यात केला जाणार आहे. दुसऱ्या दोन तोडीचे माल शेतकऱ्यांच्या शेतात उपलब्ध असून, हाही माल परदेशात निर्यातीसाठी तयार असल्याची माहिती मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : एल्फिन्स्टन ब्रिज परिसर जलमय, सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT