मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला तंत्र शिक्षण संचालनालयाने मुदतवाढ दिली आहे. याबाबतचे सुधारित वेळापत्रक 18 जानेवारीनंतर जाहीर करण्यात येणार आहे.
मराठा आरक्षणांतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून प्रवेश घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या विद्यार्थ्यांना त्यांचे मूळ प्रमाणपत्र आणि मूळ जातपडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास अवधी लागत असल्याने प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत होती. यानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने कागदपत्रे सादर करण्यास 20 जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. ज्या उमेदवारांनी प्रमाणपत्राकरिता अर्ज केल्याची पावती ऑनलाईन सादर केली आहे, अशांसाठी ही मुदतवाढ दिल्याचे कक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले.
पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या अशा उमेदवारांना 20 जानेवारीला सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने मूळ प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा आहे. जे विद्यार्थी हे प्रमाणपत्र सादर करू शकणार नाहीत त्यांना प्रवेश फेरीतील प्रवेश रद्द करून दुसऱ्या फेरीकरिता खुल्या वर्गातून पात्र ठरविण्यात येईल, असेही कक्षातर्फे स्पष्ट केले आहे. तसेच पुढील सुधारित वेळापत्रक 18 जानेवारीनंतर कक्षाच्या www.mahacet.org या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल, असेही या परिपत्रकात स्पष्ट केले आहे.
Extension for admission to vocational courses Revised schedule announced after 18 January
--------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.