बदलापुरातील खासगी रुग्णालयाकडून रुग्णांची लूट; वाढत्या तक्रारींनंतर पालिकेची नोटीस
बदलापुरातील खासगी रुग्णालयाकडून रुग्णांची लूट; वाढत्या तक्रारींनंतर पालिकेची नोटीस 
मुंबई

बदलापुरातील 'या' खासगी रुग्णालयाला पालिकेची नोटीस; अव्वाच्या सव्वा बिल आकारले जात असल्याचा आरोप

सकाळवृत्तसेवा

बदलापूर : कोरोनाबाधितांपैकी तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांची व्यवस्था शहरातच व्हावी या हेतूने बदलापूर पालिकेने शहराच्या वेशीवर असलेल्या सापे येथील खासगी सेंट्रल रुग्णालय करारबद्ध केले आहे. मात्र, या रुग्णालयाकडून गोरगरीब रुग्णांची लूट सुरू असल्याच्या तक्रारी आल्या. याप्रकरणी बदलापूर नगरपालिकेच्या वतीने रुग्णालयाला नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमधून होत असलेल्या आरोपांना दुजोरा मिळाला आहे. 

बदलापूर शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या महिन्यात मुंबई आणि उपनगरातील रुग्णालयातील खाटांची कमतरता जाणवू लागल्याने तीव्र आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांची शहरातच व्यवस्था करण्यासाठी शहराच्या वेशीवर सापे गावातील सेंट्रल रूग्णालयाशी बदलापूर पालिकेने करार केला. त्यानुसार त्यातील बहुतांश खाटा या पालिकेच्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील तीव्र आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांवर शहरातच उपचार करण्याची सुविधा उपलब्ध झाली. 

मात्र, गेल्या काही दिवसांपासून या रुग्णालयाकडून अव्वाच्या सव्वा बिले आकारली जात असल्याचे आरोप होत होते. अनेकदा रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी हजारो रुपयांची अनामत रक्कमही मागितली जात होती. त्यामुळे मृत्यूशयेवर असलेल्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी रुग्णाच्या कुटुंबीयांना पैशांसाठी धावाधाव करावी लागत होती. त्यामुळे रुग्णालयाच्या कारभाराप्रति संताप व्यक्त होत होता. याबाबत अनेकदा पालिका अधिकाऱ्यांकडे रुग्णांकडून तक्रारी केल्या जात होत्या. त्यानुसार पालिकेच्या वतीने या रुग्णालयाला नोटीस देण्यात आल्याची माहिती पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजेश अंकुश यांनी दिली आहे. 

पालिकेतर्फे आरोग्य मित्रांचे पथक
रूग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिले आकारणे, रुग्णांना रुग्णालयात दाखल करतेवेळी त्यांच्याकडे अनामत रक्कम भरण्याची मागणी करणे, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देणे अपेक्षित असतानाही पात्र रुग्णांना त्याचा लाभ न देणे अशा बाबींवरून पालिकेने रुग्णालयाला नोटीस बजावल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. राजेश अंकुश यांनी सांगितले आहे.  रुग्णांवर होत असलेल्या उपचाराची माहिती घेण्यासाठी पालिकेतर्फे आरोग्य मित्रांचे एक पथकही नेमण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

रुग्णांच्या वाढत्या तक्रारींवरून संबंधित रुग्णालयाला नोटीस बजावण्यात आली आहे. आरोग्य मित्र चौकशी करून अहवाल देतील. त्यानंतर कारवाई करण्यात येणार अाहे.
- जगतसिंग गिरासे, प्रशासक, बदलापूर पालिका

-----------------------------------

(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT