मुंबई

फेसबुकवरील मैत्रीनंतर तरुणीला पाठवलेत अश्लील फोटो; पोलिसांनी थेट UP मध्ये जाऊन आवळल्या मुसक्या

अनिश पाटील

मुंबई : समाज माध्यमांवर झालेल्या मैत्रीनंतर ग्रँट रोड येथे राहणाऱ्या तरुणीला अश्लील फोटो पाठवणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तक्रारदार तरुणी उत्तर प्रदेशात विमा कंपनीत काम करत असताना फेसबुकवरून तिची ओळख वीस वर्षीय आरोपी राजकुमार बहादुर मौर्या याच्यासोबत झाली होती. त्याने आपण उत्तर प्रदेश येथील गोरखपूर येथील रहिवासी असल्याचे सांगितले होते. त्यावेळी दोघांनीही एकमेकांचे क्रमांकाची देवाण घेवाण केले होते. त्यानंतर त्यांची भेटही झाली होती.

आरोपी रात्री अपरात्री दूरध्वनी करू लागला. तरुणीने वारंवार संदेश पाठवू नको, असे सांगितले. त्यानंतरही त्याने ऐकलं नाही. अखेर तिने मैत्री संपवून मेसेज पाठवणे बंद करण्यास सांगितले. पण त्यानंतरही आरोपी अश्लील मेसेजेस पाठवून लागला. वारंवार दूरध्वनी करू लागला. त्यानंतर या तरुणीने त्याच्यासोबतची मैत्री संपवून टाकली होती.

मात्र आरोपीने नग्न छायाचित्र पाठवून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. नेहमीच्या त्रासाला कंटाळून अखेर तरुणीने याप्रकरणी डी.बी. मार्ग पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी 354 (अ), 354 (ड)  भादंवि कलम माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याच्या कलम 67, 67(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अखेर पोलिसांनी याप्रकरणी उत्तर प्रदेशात जाऊन याप्रकरणी तपास केला असता आरोपीचा सहभाग आढळला. त्यानंतर त्याला याप्रकरणी नोटीस पाठवून पोलिस ठाण्यात हजर राहण्यात सांगण्यात आल होते. तेथे आला असता चौकशीनंतर त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: दिवसभरात काय घडलं? वाचा सर्व अपडेट्स एका क्लिकवर

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT